Sharad pawar vs Ajit pawar Esakal
पुणे

Pune Ncp Crisis : पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट

मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन झालेले असताना पुणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील उभी फूट पडली.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन झालेले असताना पुणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील उभी फूट पडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ व तरुण पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. पण अजित पवार यांना साथ देण्यासाठी देखील अनेक माजी नगरसेवक, संघटनेतील पदाधिकारी मुंबईला गेले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुणे हा कायम बालेकिल्ला राहिलेला आहे. या शहरात शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांसह आमदारांनी बंड केल्यानंतर नेमकी कोणती भूमिका घ्यायची यावरून गोंधळ निर्माण झाला होता.

थेट समोर येऊन भूमिका घेण्यास कार्यकर्त्यांनी नकार दिला होता. शहर कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांच्या बाजून उभे राहण्याचा निर्णय घेतला गेला. पण आज मुंबईमध्ये झालेल्या बैठकीला दोन्ही गटात पदाधिकारी उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांनी बोलाविलेल्या बैठकीला पुण्यातून खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे,दीपाली धुमाळ,काका चव्हाण, सायली वांजळे, कमल ढोले पाटील, मृणालिनी वाणी, महेश हांडे, बाळासाहेब रायकर , शरद डबडे, कुणाल पोकळे, सुरेखा धनिष्ठे, गणेश नलावडे, किशोर कांबळे, विक्रम जाधव, तर बांद्रा येथील एमईटी नॉलेज सिटी येथे अजित पवार यांच्या गटाची बैठक झाली.

त्यामध्ये आमदार सुनील टिंगरे, राजलक्ष्मी भोसले, दीपक मानकर, बाबूराव चांदेरे, सुभाष जगताप, युवराज बेलदरे, प्रकाश कदम, महेंद्र पठारे, प्रमोद निम्हण, आनंद आलकुंटे, दत्ता धनकवडे, बाळासाहेब बोडके, विनोद आरसे, अनिस सुंडके, प्रशांत म्हस्के, शंकर केमसे, रोहिणी चिमटे, सुनीता मोरे, सदानंद शेट्टी, विकास दांगट, बाबा धुमाळ, विजय डाकले, भीमराव गलांडे, गणेश घुले यांच्यासह आदी उपस्थित होते.

कोणता झेंडा घेऊ हाती?

पुण्यात शरद पवार, अजित पवार यांच्याशी घरगुती संबंध असलेले अनेक पदाधिकारी आहेत. त्यामुळे नेमकी कोणासोबत जायचे यावरून त्यांच्या मनात संभ्रम कायम आहे. अशा नगरसेवकांची, पदाधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे.

त्यामुळे हा तटस्थ असलेला तिसरा गट पुण्यात पाहायला मिळत आहे. तसेच काही माजी नगरसेवकांनी दोन्ही बैठकांना उपस्थिती लावत चलाखी केल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, महापालिका निवडणुका झालेल्या नसल्याने कोणीच नगरसेवक नाही, त्यामुळे त्याचा व्हीप लागू होत नसल्याचे अनेकांच्या पथ्यावर पडले आहे.

या गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर पक्षात अशी फूट पडलेली असताना आम्ही नगरसेवक नाही याचाच आनंद आम्हाला आहे, अन्यथा कोणती तरी एक भूमिका घ्यावी लागली असती. भविष्यात काय होते निवडणुका कधी होतात, तेव्हा उघड भूमिका घेऊ असे एका माजी नगरसेवकाने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT