बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि बारामती हे अतूट समीकरण आजही कायमच असल्याचा प्रत्यय अनेकदा येतो. बारामतीत एखादे विधायक काम उभे राहताना शरद पवार हे सातत्याने या कामाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात. गेल्या पाच दशकांपासूनची ही परंपरा आजही कायमच आहे. सातव कुटुंबिय व डॉ. सुनील पवार यांनी सुरु केलेल्या धों. आ. सातव कोविड हॉस्पिटलला शरद पवार यांनी आज 25 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, गटनेते सचिन सातव, माळेगावचे संचालक नितीन सातव, नगरसेवक सूरज सातव आदी या प्रसंगी उपस्थित होते.
आजपर्यंत 300 रुग्णांवर या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. बारामतीत कोरोनाची स्थिती गंभीर झालेली असताना ऑक्सिजनच्या बेडची कमतरता भासत होती, त्या वेळेस सातव कुटुंबियांनी व डॉ. पवार यांनी या हॉस्पिटलची उभारणी केली. येथे 30 ऑक्सिजनचे बेड उपलब्ध करुन दिले असून, डॉक्टर व नर्सिंग स्टाफ 24 तास उपलब्ध करुन देण्यात आला आहे. रुग्णवाहिकेचीही सुविधा देण्यात आली.
येथे दर्जेदार सुविधा, सुसज्ज आयसीयू व्यवस्था, वेळेवर औषध, सकस व दर्जेदार आहार, स्वच्छता, पिण्यासाठी आरओ सिस्टीमचे पाणी, बसण्यासाठी केलेली सुसज्ज व्यवस्था, मनोरंजनासाठी टिव्ही , सॅनिटायजर करणारे फॅन येथे बसविले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता माळेगाव कॉलनी येथील प्राथमिक शाळेत कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. सदाशिव सातव यांनी मुंबई येथे शरद पवार यांची भेट घेतली, त्यावेळी पवार यांनी या उपक्रमाची माहिती घेतली होती. आज पवार यांनी सातव यांना बोलावून हा 25 लाखांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.