NCP Sharad Pawar will attend lokmanya tilak award Ceremony 2023 pune pm modi rohit tilak AAP Arvind Kejriwal  
पुणे

Sharad Pawar News : मोदींच्या पुरस्कारासाठी शरद पवार पुण्यातच थांबणार! राज्यसभेत केजरीवालांना झटका

रोहित कणसे

पुण्यात मंगळवार, १ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यातच राहाणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक रोहित टिळक यांनी दिली आहे.

१ ऑगस्ट रोजी दिल्ली सरकाकरसंबंधी एक विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. त्यामुळे शरद पवारांनी त्या दिवशी राज्यसभेत उपस्थित राहावं यासाठी आपचे नेते अरविंद केजरिवाल प्रयत्न करणार होते. मात्र शरद पवार या दिवशी पुण्यातच थांबल्यास राज्यसभेत हा केजरीवालांना धक्का मानला जात आहे.

मागील काही दिवसांपासून शरद पवार राज्यसभेत उपस्थित राहणार की पुण्यातील टिळक पुरस्कार कार्यक्रमाला हजेरी लावणार यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. काँग्रेसच्या काही नेत्यांकडून हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांनी दिला जाण्यावर आक्षेप देखील घेतला. या चर्चेदरम्यान शरद पवार १ ऑगस्टला पुण्यातील कार्यक्रमाला उपस्थित राहाणार असल्याचा दावा टिळक पुरस्कार समितीचे रोहित टिळक यांनी केला आहे.

रोहित टिळक काय म्हणाले?

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान कार्यक्रमाच्या तयारीबाबत माहिती देताना टिळक म्हणाले की, कार्यक्रम ठरलेल्या पद्धतीनेच होणार असून अद्याप कोणी येणार नाही असं काहीच कळवलेलं नाहीये. जी परंपरा राहिली आहे आणि ज्या पद्धतीने हा कार्यक्रम होतो तसाच तो होणार आहे. हा पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीतच दिला जाईल असेही रोहित टिळक यांनी यावेळी स्पष्ट केलं.

लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान मोदींना दिला जाण्याबाबत होत असलेल्या टीकेवर बोलताना रोहित टिळक म्हणाले की, हे राजकीय व्यासपीठ नाहीये. तसेच यापूर्वी इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब देवरस, शरद पवार यांच्यासह अनेक शास्त्रज्ञांनाही हा पुरस्कार दिला गेला आहे. निरनिराळ्या क्षेत्रात काम केलेल्या लोकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामुळे याचं राजकारण का केलं जातंय हे कळत नाहीये. तसेच आत्मनिर्भर भारत या भूमिकेसाठी पंतप्रधान मोदी यांनी हा पुसस्कार द्यावा असे ठरले असेही रोहित पवार म्हणाले. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

प्रकरण काय आहे?

शरद पवार १ ऑगस्ट रोजी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर येणार आहेत . या दिवशी पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शरद पवार प्रमुख पाहुणे आहेत.

तर याच दिवशी राज्यसभेत एका महत्त्वाच्या विधेयकावर मतदान होण्याची शक्यता आहे. दिल्ली अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात हे विधेयक आहे. शरद पवार यांनी पुण्याला न राहता राज्यसभेत मतदानासाठी हजर राहावे, असे आपचे मत आहे. अरविंद केजरीवाल हे शरद पवार यांना विनंती करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निफ्टी आणखी 1,000 अंकांनी घसरू शकतो; शेअर बाजारात सातत्याने का कोसळत आहे?

आज नाही जन्मदिन नाही पुण्यतिथी तरीही गुगलने का बनवला सुप्रसिद्ध गायक केके यांचं डुडल ?

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात

Firing On School Van: उत्तर प्रदेशात देशाला हादरवणारी घटना! स्कूल व्हॅनवर तरुणांकडून गोळीबार

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगर ‘वंचित’ मतांमध्येही आघाडी घेणार का?

SCROLL FOR NEXT