NDA Khadakwasala sakal
पुणे

NDA Khadakwasala: 'आता जबाबदारी देशसेवेची!' राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४४ व्या तुकडीचा पदवी प्रदान सोहळा संपन्न

पुढील प्रवासात मोठ्या अडचणी आल्या तरी त्याचा सामना करण्याची जिद्द, परिश्रम करण्याची ताकद ठेवा. असा कानमंत्र इंदौरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे (आयआयएम) संचालक हिमांशू राय यांनी दिला.

अक्षता पवार - सकाळ वृत्तसेवा

पुणे - आयुष्यात नेहमी शिकत राहण्याची भूमिका कॅडेट्सने स्वीकारली पाहिजे. मनात कोणत्याही प्रकारचा संकोच किंवा कोणत्या पदाच्या व्यक्तीकडून शिकत आहात याचा विचार न करता सातत्याने नव्या गोष्टी शिकण्यावर त्याचबरोबर अनुकूल नेतृत्व, अजेय, भावनिक बुद्धीमत्ता, करुणा अशा गुणांना आत्मसात करण्यावर भर द्यावा.

पुढील प्रवासात मोठ्या अडचणी आल्या तरी त्याचा सामना करण्याची जिद्द, परिश्रम करण्याची ताकद ठेवा. असा कानमंत्र इंदौरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे (आयआयएम) संचालक हिमांशू राय यांनी दिला.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १४४ व्या तुकडीचा पदवी प्रदान सोहळा सोमवारी (ता. २९) प्रबोधिनीत पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राय उपस्थित होते. त्यावे ते बोलत होते. या प्रसंगी एनडीएचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल अजय कोचर, उपप्रमुख मेजर जनरल संजीव डोग्रा, एनडीएचे प्राचार्य ओ.पी.शुक्ला आदी उपस्थित होते. एनडीएच्या १४४ व्या तुकडीच्या ३६७ कॅडेट्सने विविध शाखेतून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यामध्ये मित्र देशातील १९ कॅडेट्सचा समावेश होता.

यावेळी राय म्हणाले, ‘‘अधिकारी म्हणून जेव्हा तुम्ही देशसेवेसाठी रुजू व्हाल, तेव्हा एक सक्षम नेतृत्व करण्याची गुणवत्ता तुमच्यात असायला हवी. आपल्या तुकडीचे नेतृत्व करताना त्यातील जवानांना असलेल्या अडचणी, समस्या ऐकून आणि समजूण घेण्याची क्षमता असायला हवी. तरच एक सक्षम नेतृत्व करणारा अधिकारी म्हणून तुम्ही ओळखले जाऊ शकता.’’

विविध प्रकारचे कौशल्य, करुणा, नेतृत्व अशा विविध गोष्टी कॅडेट्सला प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिकविण्यावर भर दिला जातो. लवकरच अभ्यासक्रमात आणखीन नव्या गोष्टींचा समावेश केला जाईल. ज्याचा कॅडेट्सला भविष्यात देशसेवेची जबाबदारी पार पाडताना उपयोग होईल. असे यावेळी मेजर जनरल डोग्रा यांनी सांगितले.

लष्कराला करिअर म्हणून निवड करत एनडीएममधून प्रशिक्षण पूर्ण करत आता कॅडेट्सने पुढील काळात जबाबदारी पूर्वक देशसेवा करावी. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी ही सोपी गोष्ट नसून लष्कराकडे मोठ्या आकांक्षांनी पाहिले जाते. लष्करी सेवेत विविध परिस्थितीत काम करत असताना वेगवेगळ्या आव्हानांचा सामनाही करावा लागतो. त्यामुळे शिस्त बाळगत आपल्या युनिटला एकत्रित ठेऊन काम करणे गरजेचे आहे.

- व्हाइस ॲडमिरल अजय कोचर, एनडीए प्रमुख

गुणवंत कॅडेट्सचा सन्मान-

प्रशिक्षणादरम्यान शैक्षणिक अभ्यासक्रमात उत्तम कामगिरी करण्यात आलेल्या कॅडेट्सला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यामध्ये बीएस्सी शाखेत जसकरणदीप सिंग, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्‍स (संगणकशास्त्र) शाखेत आयुष कुमार, कला शाखेत सौरव तर बी. टेकमध्ये ऋषभ मित्रा या कॅडेट्सने प्रथम क्रमांक पटकावला. यातील सौरव, जसकरणदीप आणि आयुष हे पुढे डेहराडून येथील इंडियन मिलिटरी ॲकॅडमी मधून प्रशिक्षण घेत सैन्यदलात जाणार आहेत. तर ऋषभ हा हवाईदल ॲकॅडमीमध्ये पुढील प्रशिक्षण पूर्ण करणार आहे.

तर प्रशिक्षणादरम्यान अनेक चांगले वाईट अनुभव आले. पण या प्रत्येक अनुभवातून खूप काही शिकायला मिळाले. तसेच यामुळे जीवनाला एक नवी दिशा ही मिळाली आहे. अशी भावना यावेळी विविध शाखेत प्रथम आलेल्या कॅडेट्सने व्यक्त केली.

एकूण ३६७ कॅडेट्‍सने पूर्ण केली पदवी -

शाखा - पदवी प्राप्त केलेले कॅडेट्स

बीएस्सी - ८१

बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स - ९०

बी.ए -५९

बी.टेक - १३७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharshtra Politics: ...तर १००० कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील, मुख्यमंत्रीपदावरून BJPच्या बड्या नेत्याचं खळबळजनक ट्विट

WTC Points Table: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाकडून हिसकावला 'नंबर वन'चा मुकूट; पर्थमधील विजयानंतर कसे आहे फायनलचे समीकरण?

Maharashtra Cabinet: नव्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी लॉबिंगला सुरुवात; कोणते आमदार गेलेत नेत्यांच्या भेटीला? जाणून घ्या

Madhuri Misal : पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार माधुरी मिसाळ यांचे मेट्रोमार्ग, रुग्‍णालयाच्‍या कामांना प्राधान्‍य

Share Market Closing: शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद; सेन्सेक्स 1000 अंकांच्यावर, निफ्टीने पार केला 24,200चा टप्पा

SCROLL FOR NEXT