Money esakal
पुणे

महिलांमध्ये गुंतवणूक साक्षरता गरजेची

वैयक्तिक बचत, सुरक्षित गुंतवणूक, सेवानिवृत्ती, बजेटिंग हे महिलांचे सर्वाधिक आवडीचे विषय. महिलांची पसंती ही सुरक्षित गुंतवणुकीला जास्त असते.

अक्षता पवार

वैयक्तिक बचत, सुरक्षित गुंतवणूक, सेवानिवृत्ती, बजेटिंग हे महिलांचे सर्वाधिक आवडीचे विषय. महिलांची पसंती ही सुरक्षित गुंतवणुकीला जास्त असते.

पुणे - घरातील आजारपण, मुलांचे शिक्षण (Child Education) आणि लग्नासाठी (Marriage) ऐनवेळी पैसे (Money) उपलब्ध व्हावेत, यासाठी गृहिणी नेहमीच सोने, पोस्टात एफडी, बचत गट, भिशी अशा ठिकाणी गुंतवणूक (Investment) करतात. मात्र, बदलत्या काळानुसार आता अधिक परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची आवश्‍यकता आहे. याबाबत अजूनही महिलांमध्ये (Women) गुंतवणूक साक्षरतेची गरज अधिक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

वैयक्तिक बचत, सुरक्षित गुंतवणूक, सेवानिवृत्ती, बजेटिंग हे महिलांचे सर्वाधिक आवडीचे विषय. महिलांची पसंती ही सुरक्षित गुंतवणुकीला जास्त असते. त्यामुळे यातून परतावा कमी असला तरी रक्कम सुरक्षित आहे, याची शाश्‍वती असते. त्यामुळे बहुतांश महिला सोनेखरेदी, एफडी, आरडी सारखे पर्याय निवडतात. मात्र, म्युच्युअल फंड व शेअर्समध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देणाऱ्या महिलांची संख्या कमी आहे.

‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार नंदिनी वैद्य म्हणाल्या, ‘गृहिणी किंवा घरगुती व्यवसाय करणाऱ्याच नाही, तर नोकरी करणाऱ्या महिलांचे गुंतवणुकीकडे पाहण्याचे प्रमाण कमी आहे. मुळात कशात गुंतवणूक करावी, याबाबत त्यांचा जास्त अभ्यास किंवा समजून घेण्याची मानसिकता नसते. बऱ्याचदा त्यांच्या वतीने त्यांचे पती गुंतवणूक करतात. तसेच ऑफिसमधील सहकाऱ्याच्या सांगण्याप्रमाणे पहिल्यांदाच गुंतवणूक करतात. त्यामुळे अशा गुंतवणुकीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. केवळ ऑफिसद्वारे भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) सारख्या गोष्टींमुळे थोडीफार गुंतवणूक होत असते. सातत्याने ‘मॉनिटरिंग ऑफ इन्व्हेस्टमेंट’ किंवा नवे काही पर्याय आहेत का, याबाबत केवळ ५ ते ७ टक्के महिलाच विचारतात.’

महिलांचा कल

  • ८० टक्के महिलांची २०२२साठी लक्ष्याभिमुख आर्थिक उद्दिष्टे निश्चिती

  • ४६ टक्के महिलांचे हप्त्यांवर वस्तू खरेदीस प्राधान्य

महिलांचे मत

(स्रोत- झेस्ट मनी सर्वेक्षण २०२२)

गुंतवणुकीचा पर्याय व टक्केवारी

  • ५९ - सोने व फिक्स्ड डिपॉझिट

  • ५० - पगारातून २५ ते ५० टक्के वाचविणे

  • ३१ - म्युच्युअल फंड किंवा शेअर्स

  • ५७ - गुंतवणुकीसाठी इंटरनेट व वृत्तपत्रातून मार्गदर्शन घेणे

महिलावर्ग म्युच्युअल फंड, इन्शुरन्स किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक फार कमी करतात. कारण याबाबतची माहिती घेणे अथवा ती समजून घेणे त्यांना क्लिष्ट वाटते. पारंपरिक गुंतवणुकीचा अर्थात सोनेखरेदीचा पर्याय जवळपास ५० ते ६० टक्के महिला निवडतात. मात्र, यातून रिटर्न्स किती मिळतात याचा अभ्यास कधीच केला जात नाही.

- चैतन्य गोखले, इन्शुरन्स व इन्व्हेस्टमेंट क्षेत्रातील तज्ज्ञ

आर्थिक उत्पन्नावर गुंतवणुकीचा पॅटर्न ठरतो. आयटी, बँक किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात काम करत असलेल्या किंवा जास्त उत्पन्न असलेल्या महिला प्रॉपर्टी, शेअर्स, किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. ज्यांचे मासिक उत्पन्न १० ते २० हजार रूपयांदरम्यान आहे, अशा महिला बँकेत, पोस्टात किंवा सोने यामध्ये गुंतवणूक करतात. गृहिणींच्या बाबतीत गुंतवणुकीचे निर्णय प्रामुख्याने पतीच घेतात.’

- सुधाकर कुलकर्णी, सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : अखेर नाना पटोले देणार राजीनामा! विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची स्विकारली जबाबदारी

Aadhaar Update : अलर्ट! आधार कार्ड अपडेटच्या नियमात मोठा बदल; हे कागदपत्र नसेल तर बदलता येणार नाही माहिती

Kamthi Assembly Election 2024 : कामठीमधील १७ उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त...निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली मते घेण्यात ठरले अपयशी

Ajit Pawar: मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्याबाबत अजित पवारांचं महत्वाचं भाष्य; म्हणाले, आम्ही तिघं...

Stock Market: महाराष्ट्रात भाजपच्या विजयानंतर अदानी शेअर्समध्ये तुफान वाढ; सेन्सेक्स-निफ्टीही तेजीत

SCROLL FOR NEXT