Pune Municipal Corporation sakal
पुणे

Pune Municipal Corporation : आता बैठकांचा फार्स नको... ;पुणे महापालिकेकडून गरज अंमलबजावणीची

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कर्वे रस्त्यावरील अपघातात सायकलस्वाराचा बळी गेल्याप्रकरणी पोलिसांनी क्रेनचालकास अटक केली. मात्र, वाहतुकीच्या वर्दळीच्या कालावधीत कर्वे रस्त्यावर अवजड वाहनांना परवानगी कोणी दिली? पोलिसांनी ही क्रेन मेट्रोसाठी वापरली जात असल्याचे सांगितले आहे. तर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी क्रेनला कशी परवानगी दिली? नंबरप्लेट नसताना क्रेन रस्त्यावर आलीच कशी? याबाबत पोलिस संबंधित अधिकारी, क्रेनमालक आणि ठेकेदारावर कारवाई कधी करणार? हा खरा प्रश्न आहे.

शहरातील वाहतूक समस्या सुधारण्यासाठी पालकमंत्री अजित पवार सातत्याने बैठका घेत आहेत. गेले दोन दिवस ऑनलाइन बैठकीत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पोलिस, महापालिका, पीएमआरडीए, मेट्रो, आरटीओच्या अधिकाऱ्यांना एकत्रित प्रयत्न करून वाहतूक समस्या दूर करण्याचे निर्देश दिले. परंतु, अद्यापही शहरातील ‘ब्लॅक स्पॉट’वर उपाययोजना करण्याबाबत काही ठोस सुधारणा झालेल्या नाहीत. केवळ बैठकीचा फार्स सुरू आहे की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनीही वाहतूक शाखेसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची दीड महिन्यांपूर्वी बैठक घेतली होती. मात्र, शहरातील अपघाताच्या घटना कमी झालेल्या नाहीत. मागील महिनाभरातील अपघातांचे प्रमाण पाहता वाहतूक असुरक्षित झाल्याचे दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 1st Test : Rohit Sharma संतापला; न्यूझीलंडच्या फलंदाजांनी मैदान सोडले, भारतीय खेळाडूंचा Umpire सोबत वाद

Like And Subscribe Movie Review: तरुणाई आणि सोशल मीडियाला जोडणारा धागा म्हणजे 'लाईक आणि सबक्राईब'

Jammu And Kashmir: जम्मू आणि काश्मीरला मिळणार पूर्ण राज्याचा दर्जा; नायब राज्यपालांची मंजुरी

IND vs NZ 1st Test : Sarfaraz Khan, ऋषभ पंतच्या मेहनतीवर पाणी; टीम इंडियाने गटांगळ्या खाल्ल्या; ५४ धावांत ७ विकेट्स पडल्या

Latest Maharashtra News Updates Live : महिलांच्या माध्यमातून देशात विकास साधायचाय : विजया रहाटकर

SCROLL FOR NEXT