पुणे - 'गणेशोत्सवाच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तीपासून ते सामाजिक उपक्रमाद्वारे मंडळाचे कार्यकर्ते समाजासाठी काम करतात. भविष्यात गणेशोत्सवाचे स्वरूप वाढत जाईल. त्यामुळे आता गणेशोत्सवाला रचनात्मक स्वरूप देण्याचा प्रयत्न होण्याची गरज आहे', असे मत राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.
पुणे परिवारराच्यावतीने गणेशोत्सव पुरस्काराचे वितरण आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री व उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव ट्रस्टचे हेमंत रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, पुणे परिवाराचे अध्यक्ष प्रताप परदेशी, विनायक घाटे, डॉ. मिलिंद भोई, आनंद सराफ उपस्थित होते.
यावेळी ग्राहक पेठ गणेशोत्सवाचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांना वळसे पाटील यांच्या हस्ते 'लोकमान्य जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
वळसे पाटील म्हणाले, 'पुणे शहर पेन्शनरांचे शहर, शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक नगरी पासून ते आयटी हब म्हणून ही ओळखले जाते. मराठी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात पोचला आहे. त्यामुळे पुण्याच्या गणेशोत्सवाची आता जगभर ओळख झाली आहे. आपण श्रद्धा म्हणून उत्सव साजरा करतो, मात्र गणेशोत्सव मंडळे उत्सव साजरा करतानाच समाजासाठी अहोरात्र झटतात, हे महत्त्वाचे आहे.'
चंद्रकांत पाटील म्हणाले, 'गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते वर्षभर मंडळासाठी काम करतात, ते कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा ठेवत नाहीत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुणे परिवाराच्यावतीने त्यांचा झालेला सन्मान कौतुकास्पद आहे."
सूर्यकांत पाठक म्हणाले, 'पुण्याचा गणेशोत्सव जल्लोषात करण्यासाठी 2 महिने आगोदर काम करतात.ते टिकेकडे दुर्लक्ष करतात. मात्र टीका करणाऱ्यांनी सकारात्मक बाजू देखील बघितल्या पाहिजेत. मंडळे सामाजिक उपक्रम राबवतात. मात्र त्यांना प्रसिद्धी मिळत नाही.उत्सवावर टीका करून प्रश्न सुटणार नाही.'
परदेशी म्हणाले, 'गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते काम करतात. त्यांना आर्थिक बळ देण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत.' महेश सूर्यवंशी, डॉ. मिलिंद भोई, आनंद सराफ यांनी मनोगत व्यक्त केले.
गणेशोत्सव कार्यकर्त्यांचा पुरस्काराने सन्मान
एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष सुधीर ढमाले, श्री शनी मारुती मंडळाचे अध्यक्ष सचिन पवार, खडक गणेशोत्सव मंडळाचे कार्याध्यक्ष ऋषिकेश बालगुडे, युगंधर मंडळाचे कार्यकर्ते मयूर पोटे, सेवा मित्र मंडळाचे कार्यकर्ते वैभव वाघ यांना 'आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार' देण्यात आला. शिवसाम्राज्य वाद्यपथकाचे अक्षय बलकवडे, विघ्नहर्ता न्यासचे सलीम शेख यांचा 'विशेष सन्मान' यावेळी झाला. तर मनसेचे उपाध्यक्ष प्रल्हाद गवळी यांना 'गणेश सेवा पुरस्कार' देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.