पुणे

रोगप्रतिकारशक्तीसाठी कडुनिंबाचा अर्क उपयोगी

कोरोनाविरूद्ध ५५ टक्के परिणामकारकता; निसर्ग हर्बच्या वैद्यकीय चाचण्या

सम्राट कदम

पुणे : जीवाणूविरोधी म्हणून आयुर्वेदात परिचित कडुनिंबाच्या पानांचा अर्क रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयोगात येतो. विशेष म्हणजे कोरोना होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपायासाठी हा अर्क ५५ टक्के परिणामकारक असल्याचे वैद्यकीय चाचण्यांतून सिद्ध झाले आहे. यासंबंधीचा शोधनिबंध पबमेडच्या अल्टरनेटिव्ह थेरपी इन हेल्थ ॲण्ड मेडिसीन’ या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. (Neem extract useful for immunity

and 55% effectiveness against corona)

आयुर्वेदासंबंधी संशोधन आणि विकासाचे काम करणाऱ्या निसर्ग हर्ब या खासगी कंपनीने दिल्लीतील ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद’ (एआयआयए) च्या सहकार्याने हे संशोधन केले आहे. यासंबंधीच्या वैद्यकीय चाचण्या फरिदाबाद येथील ईएसआयसी मेडीकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल येथे घेण्यात आल्याची माहिती निसर्ग हर्बचे संस्थापक गिरीश सोमण यांनी दिली आहे. ते म्हणाले,‘‘फरिदाबाद येथील रूग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि वॉर्ड बॉय आदींवर यासंबंधीची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. कोरोना रुग्णांच्या प्रत्यक्ष संपर्कात येणाऱ्या १९० लोकांवर ही चाचणी झाली. त्यातील ५५ टक्के लोकांना कोरोना झाला नाही. यासाठी नीमकॅप्सूलही आम्ही बाजारात आणले आहे.’’ एआयआयएच्या संचालक डॉ. तनुजा नेसारी, डॉ. राजगोपाल श्रीकृष्णन डॉ.असिम सेन, डॉ. मोहिनी बर्डे आदींचा या संशोधनात सहभाग आहे.

आयुर्वेदाची आधुनिक चाचणी ः

- चैन्नईतील अण्णा युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक डॉ. शानमुगा सुब्रमण्यम यांनी डॉकींग सिम्युलेशनच्या आधारे कडुनिंबाच्या अर्कातील २० पेक्षा अधिक रसायने सार्स कोव्ह-२ या विषाणूला प्रतिबंध करत असल्याचे सिद्ध

- कोरोनाविरूद्ध प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कडुनिंबाच्या अर्काचा वापर शक्य

- निसर्ग हर्बने आयुर्वेदिक इन्स्टिट्यूटच्या मदतीने प्रत्यक्ष १९० लोकांवर वैद्यकीय चाचणी

- त्या चाचणीतून कडुनिंबाच्या अर्काची कोरोना विरुद्धची परिणामकारकता ५५ टक्के असल्याचे सिद्ध

वैद्यकीय चाचणीचे संख्यात्मक निष्कर्ष

१) - कडुनिंबाचा अर्क देण्यात आलेले ः ९५

- कोरोनाची बाधा झालेले ः ३

२) कडुनिंबाचा अर्क दिला नाही असे ः ९५

- कोरोनाची बाधा झालेले ः ८

''आयुर्वेदाला आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर उतरविणे गरजेचे आहे. वैद्यकीय चाचण्यांसाठी आम्ही आमच्या खिशातले पैसे खर्च केलेत. सरकारने यासंबंधी काही रचनात्मक मदत केल्यास निश्चितच आयुर्वेदावर संशोधन करणाऱ्या संस्थांना बळ मिळेल. शक्य झाल्यास अजूनही मोठ्या लोकसंख्येवर आम्ही कडुनिंबाच्या कॅप्सुलच्या वैद्यकीय चाचण्या घेणार आहोत. ''

- गिरीश सोमण, निसर्ग हर्बचे संस्थापक

''कडुनिंबाच्या अर्काच्या जिवाणू आणि विषाणू विरोधी गुणधर्मामुळे आम्ही त्याची संशोधनासाठी निवड केली. कोरोनाच्या बाबतीत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कडुनिबांच्या अर्काचे हे कॅप्सूल उपयोग होईल. त्याचे साइड इफेक्टही तुलनेने कमी आहे.''

- डॉ. मोहिनी बर्डे, एम.डी., चाचणीसाठीच्या वैद्यकीय संचालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT