पुणे

पुणे जिल्हा बँकेने विकसित केले नवे मोबाईल अ‍ॅप

शरयू काकडे

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सभासदांसाठी नवे मोबाईल बॅंकिंग अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपला "पीडीसीसी एम अ‍ॅप" असे नाव दिले आहे. हे अ‍ॅपप २१ जूनपासून कार्यान्वित केले आहे. या नव्या अ‍ॅपमुळे पैसे पाठवणे, खात्यावरील शिल्लक रक्कम तपासणे, खात्यावरुन झालेल्या व्यवहारांचा तपशील पाहणे (मिनी स्टेटमेंट), बॅंकेचे जवळचे एटीएम आणि शाखेचे ठिकाण शोधणे आदी व्यवहार घरबसल्या करता येणार आहेत. या अ‍ॅपमध्ये बॅंकिंग व्यवहाराशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. (New mobile app developed by Pune District Bank)

जिल्हा बँकेच्या जुन्याअ‍ॅपमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला नव्हता. त्यामुळे या अ‍ॅपच्या माध्यमातून मोजक्याच बॅंकिंग सेवांचा वापर करता येत असे. हे जुने अ‍ॅप आता बंद केले असल्याचे जिल्हा बँकेचे उपमहाव्यवस्थापक (माहिती आणि तंत्रज्ञान) विजय पवार यांनी सांगितले.

पुणे जिल्हा बॅंकेचे सभासद असलेल्या बॅंक खातेदारांना या नव्या अ‍ॅपचा लाभ घेता येणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी जिल्हा बँकेचे सभासद असलेल्या आणि जुने मोबाईल अॅप वापरत असलेल्या सर्व खातेदारांनी आपापल्या मोबाईलमधील जुने अ‍ॅप रद्द करुन हे नवीन अॅप कार्यान्वित करणे आवश्यक आहे.

''जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा बॅंकेचे सर्व व्यवहार घरबसल्या करता यावेत, उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हे नवे अ‍ॅप विकसित केले आहे. यामुळे शेतकरयांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचण्यास मदत होईल.''

- विजय पवार, उपमहाव्यवस्थापक (आयटी विभाग), जिल्हा बॅंक, पुणे.

अ‍ॅप वापरण्यासाठी काय करावे

हे नवीन अ‍ॅप वापरण्यासाठी पहिल्यांदा आपल्या मोबाईलमधील जुने अ‍ॅप अन्इन्स्टॉल (काढून टाकावे) करावे. नवीन अ‍ॅप

https://play.google.com/store/apps/details?id=com.trustbank.pdccbank या लिंकवरून डाउनलोड करुन घ्यावे. आपण बँकेत नोंदवलेल्या मोबाईलवर प्राप्त झालेला आपला ग्राहक क्रमांक (कस्टमर आयडी) टाकावा. त्यानंतर आपला नोंदवलेला मोबाईल नंबर टाकावा. त्यानंतर आपणास नव्याने ओटीपी येईल. तो वापरून आवश्यक सर्व परवानगी देऊन पुढील प्रोसेस करावी. सेक्युरिटी पर्यायाच्या ठिकाणी आपला पॅन कार्ड नंबर टाकावा आणि एमपीन (Mpin) व टीपीन (Tpin) सेट करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: चंदगड मतदारसंघात शिवाजी पाटीलआघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT