New MRI unit sakal
पुणे

CT Scan Machine : ‘सीटीस्कॅन’ होणार अवघ्या काही सेकंदात! तेही रूबी हॉल क्लिनिकमध्ये

सकाळ वृत्तसेवा

पुणे - रुग्णाचा स्कॅन करायचा म्हणजे किमान २० ते २५ मिनिटे लागतात. पण, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असलेल्या नवीन ‘सीटी स्कॅन’ हा अवघ्या काही सेकंदामध्ये होणार आहे. त्यामुळे लवकर निदान आणि वेगाने उपचार करणे शक्य आहे. तसेच, ‘एमआरआय’चा वेळही पाच मिनिटांपर्यंत कमी झाला आहे.

यासाठी रुग्णांना कोणतेही जास्तीचे पैसे मोजावे लागणार नाहीत. अशी दोन्ही आधुनिक उपकरणे बसविणारे रूबी हॉल क्लिनिक हे देशातील पहिले रुग्णालय ठरले आहे. याबाबत रूबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट यांनी ‘सकाळ’ला माहिती दिली.

ते म्हणाले, 'अवघ्या दोन सेकंदांमध्ये हृदयाचा स्कॅन या नवीन सीटी स्कॅन उपकरणातून होतो. हृदयाच्या रक्त पुरवठा करणाऱ्या प्रत्येक नस स्पष्टपणे दिसतात. त्यामुळे रुग्णाला नेमका कोणता आजार झाला आहे, त्याचे निदान लगेच करता येते. त्यात वेळ जात नाही.

रुग्णावर उपचार करायला त्यातून वेळ मिळतो. या नवीन वैद्यकीय उपकरणासाठी रुग्णाला कोणतेही जास्तीचे पैसे आकारण्यात आले नाही. अशा प्रकारचे नवीन तंत्र देशात प्रथमच रूबी हॉल क्लिनिकमध्ये आले आहे.'

देशातील सर्वाधिक वेगवान ‘एमआरआय’ हा देखील रूबी हॉल क्लिनिकमधील रुग्णांच्या निदानासाठी आणला आहे. यापूर्वीच्या मशिन्समध्ये ‘एमआरआय’ करायला ३५ मिनिटे लागत होती.

नवीन मशिनमध्ये अवघ्या पाच मिनिटांमध्ये रुग्णाचा ‘एमआरआय’ होतो. त्यामुळे रूबी हॉल क्लिनिक हे अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असलेल्या रुग्णालयांपैकी एक आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच, अपघात झालेल्या रुग्णाच्या पूर्ण शरीराचा सीटी स्कॅन करावा लागतो. अवघ्या १५ ते १६ सेकंदांमध्ये हा सीटी स्कॅन होत असल्याने रुग्णाला नेमके काय झाले आहे, त्यावर उपचार कोणते करावे लागतील, याची माहिती नेमकेपणाने कळते.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर...

पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दक्षिण आशियातील सर्वात आधुनिक सीटी स्कॅन बसविण्यात आला आहे. स्कॅन करताना रक्तवाहिन्यांमधील अडथळे दिसण्यासाठी रुग्णाला ८० ते ९० मिली ‘कॉट्रास’ दिला जात होता. तो आता ४० ते ५० मिली लागतो. त्यामुळे मूत्रपिंडावर कॉट्रास होणारा दुष्परिणाम कमी करता येतो. तसेच, त्यातून होणारे रेडिएशन कमी आहे. त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केल्यामुळे त्याची गुणवत्ता निश्चित वाढली असल्याचे डॉ. महादेवकर यांनी स्पष्ट केले.

नवीन ‘एमआरआय’ हा त्रिमितीय आहे. गुंतागुंतीच्या रुग्णांचा स्कॅन करण्यासाठी हा ‘एमआरआय’ अत्यंत उपयुक्त आहे. त्यातून मिळणारे चित्र सुस्पष्ट असते. मेंदूचा ‘एमआरआय’साठी अवघे पाच मिनिटे लागतात. यापूर्वी किमान २५ ते ३० मिनिटे लागत होती. हा वाचलेल्या वेळात रुग्णावर उपचार सुरु होऊ शकतात. काही रुग्णांमध्ये भूल देऊन स्कॅन करावा लागत होता. ती गरज या नवीन तंत्रामुळे राहिली नाही.

- डॉ. प्रणव महादेवकर, रेडिओलॉजी विभागप्रमुख, रूबी हॉल क्लिनिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"45 दिवस झोप नाही, जेवणही नाही...", लोन विभागातील कर्मचाऱ्यानं कामाच्या दबावामुळे संपवलं जीवन, आई-वडिलांना शेवटचं पत्र

Maintenance Case : एक महिला, दोन वकील अन् निष्पापांची शिकार; पोटगीच्या नावावर पुरुषांना फसवणाऱ्या महिलेला हायकोर्टाचा दणका

Bigg Boss Marathi: "अरबाजच्या भिकेमुळे..."; निक्कीचं कौतुक अन् टीकाही, दुसरा फायलनलीस्ट कोण ठरणार... सर्वाधिक मतं कुणाला?

Mahavikas Agadi: महाविकास आघाडीत बिघाडी? मुंबईतल्या 6 जागांवर एकमत होईना..!

Mumbai Road Accident : गोरेगावातील ओबेरॉय मॉलसमोर भरधाव डंपरने दुचाकीला उडवलं! 13 वर्षीय मुलीचा जागेवर मृत्यू

SCROLL FOR NEXT