Pune Airport New Terminal Opening sakal
पुणे

Pune Airport : नवे टर्मिनल अखेर प्रवाशांसाठी खुले

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल (न्यू इंटिग्रेटेड टर्मिनल बिल्डिंग-एनआयटीबी) खुले होण्याची प्रवाशांची प्रतीक्षा अखेर रविवारी संपली. उद्घाटनाला चार महिने उलटल्यानंतर टर्मिनल कार्यान्वित झाले.

यावेळी नवे टर्मिनलला फुगे व गुलाबपुष्पांनी सजविण्यात आले होते. प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. पहिल्या विमानाचे उड्डाण सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाले. लेफ्टनंट कर्नल मनीषा डबास या पहिल्या प्रवासी होत्या.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिकात्मक बोर्डिंग पास देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर अन्य प्रवासी दाखल होण्यास सुरवात झाली. निर्गमनमधून (डी १) प्रवाशांना आत सोडण्यात येत होते. प्रवाशांच्या स्वागतासाठी हे प्रवेशद्वार सजविण्यात आले होते.

या वेळी विमानतळावर खासदार मेधा कुलकर्णी, विमानतळ संचालक संतोष ढोके, पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पुणे विमानतळाचे सरव्यवस्थापक एस. दत्ता, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) कमांडर संतोष सुमन आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सुमारे ४७५ कोटी रुपये खर्चून ५२ हजार चौरस मीटर क्षेत्रफळात नव्या टर्मिनलची दिमाखदार वास्तू उभारण्यात आली आहे. यामुळे पुण्याची पुढील दहा वर्षांची गरज भागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ मार्चला या नव्या टर्मिनलचे उद््घाटन झाले होते.

पहिले उड्डाण

  • पुणे ते दिल्ली (एआय ८५८)

  • वेळ : सायंकाळी ५ वाजता

  • प्रवासी : १८४

  • बे क्रमांक : ३

पहिला दिवस

  • एअर इंडिया व एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांची वाहतूक

  • ९ विमानांची उड्डाणे,

  • ९ विमानांचे लँडिंग

  • सोमवारपासून १६ विमानांची उड्डाणे, १६ विमानांचे लँडिंग

असे आहे टर्मिनल

  • क्युट चेक इन काउंटर - ३४

  • आगमन गेट - ३

  • निर्गमन गेट - ३

  • बॅगेज बेल्ट - ५

  • एरोब्रिज - ५

  • प्रवासी क्षमता - वर्षाला १ कोटी

  • तासाला - १८००

  • पुण्याशी जोडली - ३७ शहरे

आगमन झालेल्या प्रवाशांसाठी टर्मिनलहून एरोमॉलपर्यंत जाण्यासाठी दोन बस, चार गोल्फ कार्ट : ४

नवीन टर्मिनल सुरू होणे ही प्रवाशांसाठी आनंदाची बाब आहे. नवे टर्मिनल पुणे व महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसे आहे. संस्कृती व आधुनिकता याचा येथे संगम झालेला आहे. पूर्वीच्या तुलनेत नवे टर्मिनल मोठे आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होईल. येथून वर्षभरात एक कोटी प्रवासी प्रवास करतील.

- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री

प्रवाशांमध्ये संभ्रमावस्था

नव्या टर्मिनलमधून (एनआयटीबी) रविवारी एअर इंडियाच्या (एआय - ८५८) विमानाचे पहिले उड्डाण झाले. पहिल्याच उड्डाणाला एक तास विलंब झाला. दिल्लीहून येणारे विमान उशीर आल्याचा परिणाम झाला. नवे टर्मिनल प्रवाशांसाठी खुले होत असल्याने प्रवासी दुपारी एक वाजल्यापासून दाखल होत होते. अखेर पाच वाजता पहिले विमान दिल्लीसाठी झेपावले.

'एनआयटीबी' मधून रविवारपासून प्रवासी सेवा सुरू करण्याची सर्व तयारी विमानतळ प्रशासनाने पूर्ण केली होती. एअर इंडिया व एअर इंडिया एक्स्प्रेसच्या कर्मचाऱ्यांना आधीच कल्पना देण्यात आली होती. या कंपन्यांनी आपल्या प्रवाशांना माहितीसाठी शनिवारीच संदेश दिले होते. मात्र तरीही काही प्रवासी सवयीप्रमाणे जुन्या टर्मिनलमध्ये गेले. तिथे गेल्यावर त्यांना नवीन टर्मिनलची माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रवासी नवीन टर्मिनलवर दाखल झाले.

अशा प्रवाशांनी बॅग, ट्रॉली घेऊन गडबडीत नवीन टर्मिनल प्रवेश केला. अनेकांना नवीन टर्मिनल रविवारपासून सुरु होत असल्याची माहिती मिळाली नसल्याचे दिसले. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमावस्था होती. सुरवातीला प्रवाशांचा ओघ कमी होता. नंतर मात्र संख्या वाढत गेली.

दोन विमानांना उशीर

नव्या टर्मिनलवर पहिल्या दिवशी दोन विमानांना उशीर झाला. पुणे-दिल्ली विमानाचे एक तास, तर पुणे-लखनौ विमानाचे एक तास ३० मिनिटे उशिरा उड्डाण झाले. आधीची विमाने उशीर दाखल झाल्याने पुण्याहून उड्डाणाला उशीर झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भाई, IPL मध्ये कोणत्या टीमकडून खेळणार?" चाहत्याच्या प्रश्नावर Rohit Sharma चे भन्नाट उत्तर, Video Viral

Diwali Festival 2024 : टिकाऊ, इको- फ्रेंडली आकाशकंदीलांना मागणी! बाजारपेठ सजली; किमतींमध्ये दहा टक्के वाढ

Vijaya Rahatkar: विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती; अर्चना मुजुमदार असतील नव्या सदस्य

Ajit Pawar: "लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, आम्ही केंद्रातून निधी आणू"; अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं

Bigg Boss 18 Eviction : नो गेम नो फेम, दुसऱ्याच आठवड्यात 'बिग बॉस १८'च्या घरातून बाहेर झाला 'हा' सदस्य

SCROLL FOR NEXT