NIA Sakal
पुणे

NIAचा पुण्यातील PFIच्या कार्यालयावर छापा; दोघांना अटक, CRPFची तुकडी दाखल

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालयानं केरळ, तामिळनाडू, कर्नाटकसह 10 राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. त्याचबरोबर पीएफआयच्या पुण्यातील कार्यालयावर एनआयए ने छापे टाकले असून सुरक्षेच्या कारणास्तव पुण्यात सीआरपीएफची तुकडी दाखल करण्यात आली असून पीएफआयच्या दोन सदस्यांना अटक करण्यात आली आहे.

(NIA Raid on Pune PFI Office)

देश विघातक कृत्य केल्याप्रकरणी नाशिक येथे PFI या संघटनेच्या काही सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच अनुषंगाने आज पहाटे पुण्यातील कोंढवा येथे दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत PFI संघटनेच्या पूर्वाश्रमीच्या दोन सदस्यांना अटक केली. कयूम शेख आणि रजी अहमद खान या दोघांना अटक करण्यात आले असून त्या दोघांना घेऊन पथक नाशिकला रवाना झाले आहे.

दरम्यान, पुण्यासह देशातील अनेक शहरात राष्ट्रीय तपास संस्थेची आज सकाळपासून छापेमारी सुरू असून केरळमधील पॉप्युलर फ्रँट ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि ओमा सलाम, राष्ट्रीय सचिव यांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले असून संस्थेने टेरर फंडींग, संघटनेतील सुरू असलेली ट्रेनिंग या सर्व विषयी चौकशी करण्यासाठी पुण्यातील कोंढवा येथे असणाऱ्या PFIच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला.

पीएफआय ही केरळमध्ये कार्यरत असलेली कट्टर इस्लामिक संघटना आहे. 1993 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून PFI ची स्थापना झाली. 1992 मध्ये बाबरी मशीद कोसळल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी नावाची संघटना स्थापन झाली होती. तर या संघटनेचे दहशतवाद्यांशी काही संबंध आहेत का हे तपासण्यासाठी देशभरातील अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत असून पुण्यातील PFIच्या कार्यालयाजवळ सीआरपीएफची तुकडी दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, एनआयएनं तामिळनाडूतील कोईम्बतूर, कुड्डालोर, रामनाद, दिंडुगल, थेनी आणि थेंकासीसह अनेक ठिकाणी पीएफआय नेत्यांच्या घरांची झडती घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई PFI स्टेट हेड ऑफिस पुरसावक्कम इथंही झडती घेण्यात आली आहे. NIA आणि ED नं PFI चे अध्यक्ष OMA सलाम यांच्या मलप्पुरम जिल्ह्यातील मंजेरी इथं मध्यरात्रीपासून छापे टाकले आहेत. एनआयए, ईडी आणि राज्य पोलिसांनी 10 राज्यांमध्ये पीएफआयच्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: ''कशाची सुनावणी घ्यायची अन् कशाची नाही, हे एखादा पक्ष ठरवू शकत नाही'' उद्धव सेनेच्या आरोपांवर चंद्रचूड संतापले

Umpire Jobs : क्रिकेट अंपायर बनायचं आहे? जाणून घ्या प्रक्रिया आणि मिळणारी लाखोंची पगार

OLA Gig Electric Scooter : ओलाचा धमाका! 40 हजारांपेक्षा कमी किंमतीत स्कूटर लाँच, एका चार्जिंगमध्ये धावणार 112 किलोमीटर

Paresh and Madhugandha Interview : आता आम्ही ॲक्शन चित्रपट बनविणार - परेश आणि मधुगंधा

Kashinath Date: पारनेरमध्ये लंकेंच्या गडाला सुरुंग लावणारे काशिनाथ दाते कोण? काय होती रणनीती?

SCROLL FOR NEXT