निगडी - तळेगाव दाभाडे बसमध्ये बसण्यासाठी प्रवाशांची उडालेली झुंबड. 
पुणे

‘पीएमपी’कडून दुजाभाव का?

शिवाजी आतकरी

निगडी - पीएमपीने बस फेऱ्या कमी केल्यामुळे ग्रामीण भागात जाणाऱ्या बस तुडुंब भरत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. पुणे, पिंपरी- चिंचवड शहरालगतच्या गावांमध्ये पीएमपीची बससेवा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून बस संख्या कमी केली आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसमध्ये बसविले जात असून अक्षरशः लटकून प्रवास करावा लागत आहे. तसेच, खासगी वाहनांचा आधार प्रवाशांना घ्यावा लागत आहे. 

पास केंद्रही बंद
राजगुरुनगर येथील पास केंद्र सहा महिन्यांपासून बंद केले आहे. पास काढण्यासाठी भोसरी किंवा पुणे स्टेशनला जावे लागते. तेथील रांग पाहता हे वेळखाऊ असल्याच्या तक्रारी चाकण, राजगुरुनगर परिसरातील प्रवाशांच्या आहेत.

शहरी-ग्रामीण भेद
पीएमपीच्या राजगुरुनगर, वडगाव मावळ, पिरंगुट, तळेगाव ढमढेरे अशा ग्रामीण भागात जाणाऱ्या बसची अवस्था वाईट असते. जुन्या व खिळखिळ्या बस या मार्गांवर धावतात. बस बंद पडण्याचे प्रमाण अधिक आहे. शहरातील मार्गांवर मात्र नवीन बस धावतात. 

चांगल्या उत्पन्नाकडे दुर्लक्ष का?
तेव्हाच्या पीसीएमटीने १९९२ मध्ये राजगुरुनगरला बस सेवा सुरू केली. सध्या सोळा बस मार्गावर धावतात. प्रत्येक बस अडीच फेऱ्या मारते, असे सांगितले जाते. एक बस दिवसभरात ३० ते ३५ हजार रुपये उत्पन्न मिळवते. तरीही कमी क्षमतेच्या, जुन्या व खिळखिळ्या बस मार्गावर सोडल्या जातात. 

बसफेऱ्या कमी होण्याची कारणे : कंत्राटी बस सेवेतून कमी, ब्रेकडाउनचे प्रमाण वाढले व चालक- वाहकांची संख्या कमी.
परिणाम : मार्गावरील बस गाड्यांना तुडुंब गर्दी, प्रवाशांचे प्रचंड हाल, पीएमपीचे उत्पन्न घटणार, खासगी वाहन चालकांची चांदी.
कोणत्या मार्गांवर परिणाम : भोसरी-राजगुरुनगर, निगडी- तळेगाव दाभाडे, निगडी- वडगाव मावळ

एकूण बस - १२९२
मार्गावरील बस - १०८०
कंत्राटी बस - ६५३
कंत्राटी बस मार्गावर - ३५०
शहराबाहेरचे एकूण मार्ग - १२
सध्या सुरू असलेले मार्ग - १०
बंद मार्ग (घोटावडे, पिंपरी) - २

कंत्राटी बसची संख्या कमी झाली आहे. त्या बस आरटीओकडे पाठविल्या आहेत. हळू हळू त्या पुन्हा सेवेत दाखल होत आहेत. त्यामुळे लवकरच मार्गावर बस संख्या पूर्ववत होईल. बस बंद केलेल्या नाहीत. मार्गांवरील काही फेऱ्या कमी केल्या आहेत.
- सी. व्ही. वर्पे, आगारप्रमुख, निगडी

नादुरुस्त बस व फेऱ्या कमी केल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे पीएमपीवरील विश्‍वास उडत आहे. प्रवाशांना ‘स्मार्ट’ सुविधा मिळाव्यात.  
- किरण भालेकर, अध्यक्ष, प्रवासी संघटना, राजगुरुनगर

बसमध्ये बसायला जागा तर सोडाच, उभे राहायलाही जागा मिळत नाही. आमच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींचे प्रवासात हाल होतात. बसला कायमच गर्दी असते.
- वाल्मीक जगताप, प्रवासी, देहू

पीएमपी बसचा प्रवास आता नको वाटतो, इतकी गर्दी असते. बसमध्ये जागा नसते. विद्यार्थिनींचे हाल होतात. मग कधीकधी आम्ही खासगी वाहनाने प्रवास करतो.
- संध्या नरवडे, विद्यार्थिनी, कामशेत

सध्या बसला गर्दी खूप असते. बससंख्या कमी झाल्याचे दिसते. वेळेवर बस येत नाही. चौकशी केली तर अधिकाऱ्यांकडून नीट उत्तरे मिळत नाहीत.
- मिलिंद तरस, प्रवासी, तळेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT