पुणे - ब्रिटिश सरकारची (British Government) प्रख्यात चेव्हनींग शिष्यवृत्ती (Chevening Scholarship) सिव्हिल अकाऊंट सर्व्हिसमधील निमिषा झा (Nimisha Zha) आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेतील (एनआयए) उपमहानिरीक्षक अमरेश मिश्रा (Amresh Mishra) यांना नुकतीच जाहीर झाली आहे. पती-पत्नीला एकाच वेळी ही मानाची शिष्यवृत्ती मिळाली आहे.
या शिष्यवृत्तीतंर्गत निमिषा आणि अमरेश पुढील महिन्यात एक वर्षासाठी इंग्लंडमध्ये जाणार आहेत. ‘मास्टर इन पब्लिक पॉलिसी’ या विषयावर ते अभ्यास करणार आहेत. त्यासाठीचा संपूर्ण खर्च ब्रिटिश सरकार करणार आहे. शिष्यवृत्तीसाठी भारत सरकारने त्यांची एक वर्षांची शैक्षणिक रजाही मंजूर केली आहे. निमिषा या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉनिमिक्समधून तर, अमरेश हे ऑक्सफोर्ड विद्यापीठातून शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहेत. जागतिक स्तरावर विकासकेंद्रीत नेतृत्त्व तयार करण्यासाठी ब्रिटिश सरकारकडून १९८३ पासून ही शिष्यवृत्ती दिली जाते.
निमिषा या २००९ मध्ये केंद्र सरकारच्या सिव्हिल अकाऊंट सर्व्हिसमध्ये रुजू झाल्या असून सध्या केंद्रीय वित्त मंत्रालयात उपकंट्रोलर जनरल ऑफ अकाऊंटंट आहेत. या पूर्वी दिल्ली नगर निगममध्येही त्यांनी काम केले आहे. पुण्याचे माजी प्राप्तीकर आयुक्त सुधीरकुमार झा यांची निमिषा ही मुलगी आहे. निमिषा यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पूर्ण झाले आहे. त्या मॅरेथॉनपटू असून ‘किस् सिल्क ऑफ छत्तीसगड’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. निमिषा मंगळवारी आई- वडिलांना भेटण्यासाठी पुण्यात आल्या होत्या, तेव्हा त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. प्रतिष्ठेची ही शिष्यवृत्ती एकाच वेळी आम्हा उभयतांना मिळाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
अमरेष हे मूळचे बिहारमधील असून धनबाद आयआयटीमधून त्यांनी पेट्रोकेमिकल इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले आहे. छत्तीसगड केडरचे ते आयपीएस असून दंतेवाडा, बस्तर आदी जिल्ह्यांत त्यांनी पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. ‘एनयआयए’मध्ये दिल्लीत ते उपमहानिरीक्षक या पदावर सध्या कार्यरत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.