पुणे - मागील चौदा महिन्यांपासून आजपर्यंतच्या (ता. १८) कालखंडातील कोरोना लढाईत (Corona War) पुणे जिल्ह्यातील (Pune District) नऊ लाख नागरिकांनी कोरोनावर विजय (Win) मिळविला आहे. यामध्ये सर्वाधिक साडेचार लाख पुणेकरांचा समावेश आहे. या कालखंडात पावणेदहा लाख नागरिकांना कोरोनाने घेरले होते. यापैकी पंधरा हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ६५ हजार सक्रिय (ॲक्टिव्ह) रुग्ण आहेत. (Nine lakh people have so far won the battle of Corona in Pune district)
जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी २१ हजार ८५६ जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. उर्वरित ४३ हजार २२७ गृहविलगीकरणात आहेत. दरम्यान पुणे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या पंधरा हजारांवर आली आहे. शहरातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी ६ हजार ३५६ जण रुग्णालयात उपचार घेत असून ८ हजार ८७६ गृहविलगीकरणात आहेत.
आज कोरोनामुक्त रुग्णांचा नऊ लाखांचा आकडा ओलांडला गेला आहे. आजअखेर एकूण ९ लाख ४०० जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यामध्ये शहरांतील सर्वाधिक रुग्ण आहेत. शहरात ९ मार्च २०२० ला राज्यातील पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. तेव्हापासून आजतागायत पुणे जिल्ह्यात एकूण ९ लाख ८० हजार ९८६ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील ४ लाख ६२ हजार १७२ इतकी आहे. पिंपरी चिंचवडमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ४३ हजार ९४७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील रुग्णसंख्या २ लाख ८ हजार १९२ इतकी झाली आहे. नगरपालिका हद्दीत ५१ हजार ८९१ तर कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १४ हजार ७८४ एकूण कोरोना रुग्ण आहेत.
क्षेत्रनिहाय कोरोनामुक्त रुग्ण
- पुणे शहर --- ४ लाख ३९ हजार ९७
- पिंपरी चिंचवड --- २ लाख २६ हजार ३९९
- जिल्हा परिषद --- १ लाख ७६ हजार १७१
- नगरपालिका --- ४५ हजार ४८२
- कॅंटोन्मेंट बोर्ड --- १३ हजार २६०
एकूण पुणे जिल्हा --- ९ लाख ४०९
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.