PM Surya Ghar Yojana sakal
पुणे

PM Surya Ghar scheme : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी,४१ हजारांवर घरांचे मासिक वीजबिल होणार शून्य.

नवनाथ भेके निरगुडसर

निरगुडसर : मासिक वीजबिल शून्यवत करण्यासाठी सुरु असलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल ४१ हजार ११५ घरगुती ग्राहकांनी सहभाग घेतला असून त्यांचे मासिक वीजबिल शून्य होणार आहे.

सद्यस्थितीत ९ हजार ८०८ घरगुती ग्राहकांकडे छतावरील ३९.२ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने त्यांचे वीजबिल देखील शून्यवत झाले आहे.घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत आहे.

सौर प्रकल्प उभारण्यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे तसेच महावितरणकडून १० किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजूरी देण्यात येत आहे व सौर नेटमीटर देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.

प्रधानमंत्री घरकुल योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पांतून गरजेपेक्षा वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून विकत घेण्यात घेत आहे व त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे.छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये,दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे.

तसेच गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व कॉमन उपयोगासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट १८ हजार रुपये असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.३०० युनिटपर्यंत मासिक वीजवापर असणाऱ्या घरगुती वीजग्राहकांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त आहे. तसेच सुमारे २५ वर्ष या सौर प्रकल्पांतून घरातील वीजवापरासाठी मोफत वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत घरगुती व गृहसंकुलांनी सहभागी व्हावे’ असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये या योजनेत सहभागासाठीआतापर्यंत प्राप्त ४१ हजार ११५ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. तर ९ हजार ८०८ ग्राहकांकडे छतावरील ३९.२ मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. मंजूर अर्जांमध्ये (कंसात- कार्यान्वित प्रकल्प) पुणे जिल्हा- १८ हजार २४५ (३७९८), सातारा जिल्हा- ४ हजार २५२ (९७३), सोलापूर जिल्हा- ६ हजार ३४१ (१६०३), कोल्हापूर जिल्हा- ७ हजार ३२८ (२४७५) आणि सांगली जिल्ह्यात ४ हजार ९५९ अर्ज मंजूर झाले असून ९५९ सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. सद्यस्थितीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये छतावरील आणखी ३६८२ सौर प्रकल्पांचे काम वेगाने सुरु आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सहभागी होण्यासाठी घरगुती व गृहसंकुल ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. फोटो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections साठी MNSची जय्यत तयारी; मुंबईत पुन्हा राज ठाकरेंची तोफ धडाडणार! 'या' दिवशी होणार सभा

Sultan of Johor Cup साठी भारताच्या ज्युनियर हॉकी संघाचे नेतृत्व अमीरकडे, जाणून घ्या वेळापत्रक आणि संघ

Haryana Assembly: हरियाणात विजय मिळाल्यास, काँग्रेसला 'या' पाच मुद्यांवर 'बूस्टर' मिळणार

Akola Violence: अकोल्यात तणाव! दोन गटात राडा, जमावाने दगडफेक करुन कार पेटवल्या

Singham Again Trailer Launch : "माझी लेक बेबी सिंबा" ; सिंघमच्या ट्रेलर लाँचला रणवीरने केलं लेकीचं कौतुक , बायकोविषयी म्हणाला...

SCROLL FOR NEXT