Nirmal Wari Activities  sakal
पुणे

Nirmal Wari Activities : पुणे महापालिकेतर्फे निर्मल वारी उपक्रम

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे मंगळवारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर लाखो वारकरीदेखील शहराच्या बाहेर पडले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे मंगळवारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर लाखो वारकरीदेखील शहराच्या बाहेर पडले. त्यानंतर महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या काही तासात शाळा, मंदिरे, धर्मशाळा, रस्ते, उद्यानामध्ये स्वच्छता मोहीम सुरु केली. यामध्ये सुमारे २५६ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले.

शहरात दोन दिवस दोन्ही पालखीचा मुक्काम होता. या दोन्ही पालखी सोहळ्याचे शहरात आगमन झाल्यापासून ते शहरातून बाहेर जाईपर्यंत स्वच्छतेवर भर देण्यात आला होता. नाना पेठ, भवानी पेठेत पालखीचा मुक्काम असल्याने तेथे पादुकांच्या दर्शनासाठी लाखो नागरिक आले होते. तेथे २४ तास ७०० कर्मचारी स्वच्छतेच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले होते.

वारकऱ्यांचा मुक्काम पेठांमध्ये असल्याने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय, कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयासह, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय, हडपसर मुंढवा, रामटेकडी वानवडी या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये रस्त्यावर पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, चहाचे कप, पाण्याचे ग्लास, खाद्यपदार्थ, केळीचे साल यांसह अन्य प्रकारचा कचरा झाडणकाम करून संकलित करण्यात आला.

महिला वारकऱ्यांसाठी पालिकेच्या शाळांमध्ये निवासाची व्यवस्था होती. तेथे मोफत सॅनिटरी नॅपकिन, हिरकणी कक्ष स्थापन केले होते. तेथील स्वच्छता करण्यात आली. दिंड्या पुढे गेल्यानंतर पेठांमधील रस्ते, लष्कर भागातील रस्ते, सोलापूर हडपसर रस्ता यांसह अन्य भागात स्वच्छता केली. यामध्ये २५६ टन कचरा संकलित केला. त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली आहे.

- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT