पुण्यात लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न मार्गी लागेल असंही त्यांनी सांगितलं. आपल्याला दोन गोष्टींचे समाधान वाटले असेही ते पुण्यातील कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूलाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. यानिमित्त बोलताना गडकरींनी पुण्यातील प्रकल्पांविषयी माहिती दिली. तसंच पुण्यात लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न मार्गी लागेल असंही त्यांनी सांगितलं. आपल्याला दोन गोष्टींचे समाधान वाटले असेही ते पुण्यातील कार्यक्रमात बोलताना म्हणाले. यात पुणे मेट्रो आणि दुसरा विमामतळाचा विषय असल्याचं त्यांनी सांगितलं.
मी एक नवी मेट्रो शोधलीये. त्याची कॅास्ट एक कोटी रुपये पर किलोमीटर. ८ डब्ब्यांची ही मेट्रो. बिझनेस क्लास आहे. एअर होस्टेस सगळं असणार. या मेट्रोचा वेग ताशी १२० किंमीने असेल म्हणजे आता चंद्रकांत दादा तुम्हांला ३:३० तासांत कोल्हापुरला जाता येईल. इथे बेरोजगार लोकांना नोकरी देणार असेही गडकरी म्हणाले. मेट्रोच्या या कामासाठी काही पैसे न घेता मी कन्सल्टंट बनण्याासठी मी तयार आहे. यामध्ये इंटरनेट, वायफाय, टेलिव्हिजन मोफत मिळणार आहे. याचं तिकिट एसटीच्या तिकिटाइतकं असेल. त्याचं स्पीड तासाला १४० इतकं आहे. चंद्रकांत दादा तुम्हाला या ट्रेनने तुम्हाला पावणे तीन ते तीन तासात कोल्हापूरला जाता येईल आणि स्टेशनलाच थांबेल असं गडकरी म्हणाले.
मला आज दोन गोष्टींचा आनंद झाला ज्याबद्दल याआधी दु:ख वाटत होतं. पुण्याच्या मेट्रोचं काम सुरु झालं नाही पण नागपूरचं पुढे गेलं. तेव्हा पुण्यात माझ्यावर, फडणवीसांवर टीका झाली. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तेव्हा पुण्यात आलेलो. पेच सोडवण्यासाठी चर्चा करायची होती आणि त्यावेळी पवारसाहेब सोबत होते. पुण्यात मेट्रो अंडरग्राउंड की वरून असा प्रश्न होता सर्वांसमोर होता. आम्ही म्हणणं मांडलं की, आपण जेवढं अंडरग्राउंड करू तेवढा खर्च वाढेल. त्यामुळे तिकिटही वाढेल. तेव्हा मार्ग निघाला आणि काम वेगाने सुरु झालं. आज त्याचं समाधान वाटल्याच्या भावना गडकरींनी व्यक्त केल्या.
दुसरा विषय विमानतळाचा, अनिल शिरोळे खासदार असताना, तसंच गिरिषजींनी यासाठी पाठपुरावा केला. सुरुवातीला एअर फोर्सचे चीफ जागा द्यायला तयार नव्हते. त्यावेळी अधिकारी चांगले होते त्यांना हक्काने जागा हवीच असं सांगितलं. तेसुद्धा यासाठी तयार झाले आणि आज ते काम झालं. विमानतळावर उतरल्यावर मला बाजुला विमानतळाचे एक्सटेंशन पाहून बरं वाटल्याचं गडकरींनी सांगितलं.
गडकरींनी पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न राहिला असल्याचं यावेळी सांगितलं. ते म्हणाले की, आता एका प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा. तेरा एकर जागा अजुन डिफेन्सकडू मिळाली नाही. पण पुण्याचे एअरफोर्स अधिकारी अधिकारीनी जागा दिली नाही. आता एअरफोर्सला चंदिगढला जागा पाहिजे. चंदिगढमध्ये एअरफोर्सला जागा द्यायची आणि त्यांनी पुण्याला जागा द्यावी असं म्हटलंय. आता पंतप्रधानांनी तयार केलेल्या इन्फ्रास्ट्रक्चची कमीटी आहे त्याचा अध्यक्ष मी आहे. सगळे विषय माझ्याकडे येतात. आता परिस्थिती अशी आहे की, अजेंड्यात विषय टाकला की होऊन जाईल. आता १३ एकर जागेचा विषय मी अजेंड्यात टाकेन आणि मंजुर करून घेईन. पुण्याला इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि त्याची क्षमता वाढेल. पुण्याच्या लोकांची सोय होईल.
नदी विकास प्रकल्प, मुळा मुठा नदीचा १४०० कोटींचा, तो अडकून पडलाय. शेतकरी बैलांच्या मागे तुतारी घेऊन राहतात तसं सरकारमध्ये प्रशासनाच्या मागे तुतारी घेऊन रहायला हवं. आता महापौर म्हणाले की, जायकाचे टेंडर निघालेय आणि त्या प्रकल्पाला दिशा मिळाल्याचे गडकरी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.