पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ६ एप्रिल २०२१ मध्ये घेतलेल्या इयत्ता आठवीसाठी घेतलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी (एनएमएमएस) शिष्यवृत्ती योजना परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या ‘www.mscepune.in’ आणि‘https://nmms.mscescholarshipexam.in’ संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
दरम्यान, या परीक्षेची अंतरिम उत्तरसुची यापुर्वी जाहीर करण्यात आली होती. यात मॅट आणि सॅट पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तरांबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे २३ एप्रिल २०२१ अखेरपर्यंत पाठविण्याबाबत यापुर्वीच प्रसिद्ध केले होते. त्यानुसार मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन आता अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन, आक्षेप स्विकारले जाणार नाहीत, तसेच या परीक्षेसाठी गुणपडताळणी केली जात नाही याची मुख्याध्यापकांनी, पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे राज्य परिषदेने स्पष्ट केले आहे. या अंतिम उत्तरसूचीनुसार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेचा निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, याची संबंधित मुख्याध्यापकांनी, पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, अशी माहिती परिषदेच्या आयुक्त तुकाराम सुपे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.