पुणे : पुणे जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी (ता.१४ ) तीन हजारांच्या आत आली आहे. यामध्ये पुणे शहरातील केवळ १५७ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे. सोमवारी ४७५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
याउलट ७२६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजच्या एकूण रुग्णांत पुणे शहरातील १९६ जण आहेत. दिवसभरात ५ हजार ५७४ कोरोना चाचण्या
घेण्यात आहेत. गेल्या २४ तासांत १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच चिंचवडमध्ये ९५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १५६, नगरपालिका कार्यक्षेत्रात २२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील पाच, पिंपरी-चिंचवडमधील दोन, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील चार आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एका जणाचा समावेश आहे. नगरपालिका क्षेत्रातील एकाही रुग्णाचा सोमवारी मृत्यू झाला नाही.
सद्यस्थितीत विविध रुग्णांचलयात मिळून २ हजार ८९३ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तसेच ६ हजार १९६ रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ८ हजार ६३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ४१५ रुग्ण आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही रविवारी (ता.१३) रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी (ता.१४) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.