पुणे - शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. झोपडपट्ट्यांच्या भागात तर तो वेगाने पसरतो आहे. असे असताना शहरातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेली जनता वसाहत मात्र याला अपवाद ठरलीय. येथील नागरिकांनी दाखवलेली स्वयंशिस्त आणि जागरुकता यासाठी कारणीभूत ठरली आहे. शिस्त राखल्यास दाटीवाटीच्या भागातही कोरोनाला रोखता येऊ शकते, हे या निमित्ताने जनता वसाहतीतील रहिवाशांनी दाखवून दिले आहे.
पुणे शहरातही अनेक भागात लहान मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. दाटीवाटीने लोक तेथे वास्तव्यास आहेत. अशा अनेक ठिकाणी कोरोनाचा शिरकाव होऊन तो वाढताना दिसत आहे. त्याला फक्त जनता वसाहत अपवाद ठरलीय. जवळपास 60 हजारांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या या वसाहतीत अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. या विषाणूचा आपल्या वस्तीत प्रवेश होऊ नये यासाठी जनता वसाहत कृती समितीचे सदस्य लढत आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सुमारे 14 ते 15 हजार घरे असणाऱ्या या वसाहतीत हातावर पोट असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. लॉकडाऊनच्या काळात या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. या विभागातील शिवसेनेचे विभागप्रमुख सूरज लोखंडे यांनी इथल्या नागरिकांना मदतीचा हात देऊ केलाय. तसेच वस्तीमध्ये निर्जंतुकीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. जीवनावश्यक सेवा देणाऱ्या लोकांबरोबरच सर्वांनी या कक्षातूनच ये जा करावी, असा नियमच करण्यात आला आहे. तो नियम तेथील रहिवासी काटेकोरपणे पाळताना दिसत आहेत. तसेच दररोज किमान 10 लोकांना ×म्ब्युलन्समधून मोफत तपासणीसाठी नेले जाते. वसाहतीमधील अनेक रस्ते बंद करण्यात आल्यामुळे एकाच ठिकाणाहून प्रत्येक नागरिकांना जावे लागते. परिणामी त्यांची तपासणी झाल्याशिवाय त्यांना आत सोडले जात नाही.
वसाहतीमधील लोकसंख्या : 60 हजार
परिसरातील घरे : 14 ते 15 हजार
दिवसभरात घरांची तपासणी : 100
आतापर्यत तपासणी झालेले नागरिक : 45 हजार
घरात रहात असलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून त्यांना अत्यंत माफक शुल्कात घरपोच भाजीपाला देण्याची सुविधा दिली जाते. तसेच अत्यावश्यक सेवा -सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप ही करण्यात आले आहे. अशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांसह योग्य ती खबरदारी घेऊन अत्यंत दाटीवाटीची असणारी जनता वसाहत सुरक्षित ठेवली आहे.
जनता वसाहतीमध्ये कोरोनाबाबत सातत्याने जनजागृती केली जात आहे. तसेच नागरिकही सूचनांचे पालन करीत आहेत. त्यामुळे वसाहतीमध्ये कोरोनाचा शिरकाव अद्याप होऊ शकला नाही. लॉकडाऊन असेपर्यंत इथल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन जनता वसाहत कृती समितीने दिले आहे
-सूरज लोखंडे, शिवसेना विभागप्रमुख आणि जनता वसाहत कृती समिती सदस्य
अशी घेताहेत रहिवाशी काळजी
-परिसरातील रस्त्यावर निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी
-नागरिकांकडून "सोशल डिस्टन्सिंग'चे पालन
-स्वच्छतागृहांची दिवसातून तीन वेळ साफ सफाई व निरर्जंतुकीकरण
जनता वसाहतीतील सार्वजनिक शौचालयांचे दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण केले जाते. वस्तीत दिवसातून दोनदा रस्त्यांची सफाई करण्यात येते. दुकानांसमोर सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत खबरदारी घेतली जाते. याशिवाय सर्व्हेक्षण करून 45 हजार लोकांची तपासणी आतापर्यंत करण्यात आली आहे.
-चेतन कबाडे, क्षेत्रीय अधिकारी, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.