pooja Chavan 
पुणे

पूजा चव्हाणचे आई-वडिल म्हणतात, ''आत्महत्येनंतर झालं ते केवळ राजकीय नाट्य''

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत आई-वडिलांचा जबाब, आत्महत्या प्रकरणात कोणावरही आरोप नसल्याचे स्पष्टीकरण

सकाळ वृ्त्तसेवा

पुणे, : ''पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आपला कोणावरही आरोप नाही, या विषयला विनाकरण राजकीय वळण देण्यात आले, मुलीच्या आत्महत्यानंतर घडलेला सर्व प्रकार राजकीय नाट्य होते'', असा जबाब मुलीच्या आई-वडिलांनी वानवडी पोलिसांकडे दिला आहे.

वानवडीजवळील महमदवाडी येथे 7 फेब्रूवारीला पूजा चव्हाण या तरुणीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उड़ी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर वानवडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास 'जैसे थे' ठेवण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर वानवडी पोलिसांकडून केवळ तपास सुरु आहे, इतकेच उत्तर मिळत होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच वानवडी पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांना पुण्यात बोलावून त्यांचा जबाब नोंदवून घेतला. संबंधित प्रकरणाचा राजकारणाशी कुठलाही संबंध नसल्याचे तसेच तरुणीच्या आत्महत्या घटनेस कोणालाही जबाबदार धरले नसल्याचे तिच्या कुटुंबीयांनी जबाबत स्पष्ट केले. तसेच हा सर्व प्रकार म्हणजे राजकीय नाट्य असल्याचे त्यांनी जबाबामध्ये नमूद केले आहे.

पोलिस टिकेचे धनी, तरीही भूमिका सावधच

संबंधित प्रकारणावरुन पुणे पोलिसांवर सडकून टिका झाली, त्यानंतरही पोलिसांकडून आत्तापर्यंत केवळ सावध भूमिका घेण्याकडेच कल राहिला आहे. या प्रकरणाच्या तपासाबाबतही वानवडी पोलिसांकडून कुठलेही ठोस उत्तर दिले जात नाही. विशेषत: या प्रकाणाशी संबंधित कुठलीही माहिती बाहेर पोचणार नाही, यादृष्टीने पोलिस कर्मचाऱ्यांना तंबी देण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील १३१०९ मतांची आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT