पुणे : शहरातील महत्वाच्या आणि गंभीर समस्या सोडविण्याचे काम बाजूला ठेवत पुणे महानगरपालिकेने चक्क एका चित्रकार दाम्पत्याला रंगांचा वास येत असल्याचे कारण दाखवत नोटीस पाठवली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुण्यातील कर्वेनगर भागात राहणाऱ्या नागरिकांच्या तक्रारीवरून या दाम्पत्यांला महापालिकेने नोटीस पाठवली आहे. जेव्हा या नोटिशीविरोधात या दाम्पत्यांने बाजू मांडली तेव्हा मात्र महापालिकेला आपली चूक लक्षात आली. आता त्यांनी आपली नोटीस मागे घेतली आहे. मात्र या सगळ्या प्रकारात या दाम्पत्यांला विनाकारण मानसिक त्रास सोसावा लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनामिक कूचन आणि कृष्णा कूचन दोघेही कलाकार, पुण्यातल्या कर्वेनगर भागात भाड्याच्या घरात राहतात. लॉकडाऊनमध्ये व्यवसाय ठप्प झाल्याने ते आर्थिक अडचणीत आले आणि स्टुडिओतच आपले घर मांडले. पण समोर राहणाऱ्या एका कुटुंबाने रंगांचा वास येत असल्याची तक्रार पुणे महापालिकेकडे केली. कधी नव्हे तर महापालिकाही इतकी सतर्क झाली की तात्काळ त्यांनी कूचन यांच्या घरी पाहणीसाठी कर्मचारी पाठवले आणि त्यांना नोटीसही पाठवली.
दरम्यान, त्यात फॅन बसवणे, व्यावसायिक काम घरात हलवण्याचा सल्लाही दिला. अखेर या दाम्पत्यांने जेव्हा आवाज उठवला तेव्हा मात्र महापालिकेने नोटीस मागे घेतली. पण या सगळ्या प्रकारात त्यांचे कामाचे दोन महिने वाया गेले आहेत. चित्रकारांनी कुठे चित्र काढायचे हे महापालिका ठरवणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेच्या या कारवाईमुळे आमचे दोन महिने वाया गेले, लॉकडाऊननंतरच्या या काळात आमचे नुकसान झाले असेही या दाम्पत्याचे म्हणणे आहे.
(संंपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.