Ladki Sunbai Yajna 
पुणे

Ladki Sunbai Yojna: आता 'लाडकी सुनबाई योजना'! बारामतीतल्या हॉटेलनं आणलेली ही योजना नेमकी काय? भन्नाट ऑफरची सर्वत्र चर्चा

Amit Ujagare (अमित उजागरे)

बारामती : महाराष्ट्र शासनानं 'लाडकी बहीण योजना' आणि 'लाडका भाऊ योजना' आणल्या आहेत. या योजनांना तुफान प्रतिसाद मिळाला आहे. याच धर्तीवर आता बारामतीतील एका हॉटेल चालकानं लाडकी सुनबाई योजना आणली आहे. याची सध्या बरीच चर्चा सुरुए. पण ही योजना नेमकी काय आहे? जाणून घेऊयात.

सरकारनं आणलेली योजना काय?

राज्य शासनानं आणलेल्या लाडकी बहीण योजनेंतर्गत राज्यातील केशरी आणि पिवळ रेशनकार्ड असलेल्या प्रत्येक घरातील दोन महिलांना दरमहिना १५०० रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी २१ ते ६० वयोगटाची अट आहे. तसंच कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणं गरजेचं.

लाडका भाऊ योजना

राज्य सरकारनं आणलेल्या 'लाडका भाऊ योजना' अर्थात 'मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना' असं या योजनेचं अधिकृत नाव आहे. या योजनेंतर्गत सध्या बेरोजगार असलेल्या १२ वी पास झालेल्या तरुणांना दरमहा ६ हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या तरुणांना ८ हजार रुपये तर पदवीधर विद्यार्थ्यांना १० हजार रुपये स्टायपेंड देण्यात येणार आहे. यासाठी १८ ते ३५ वर्षे वय असणं गरजेचं. बेरोजगार तरुणच यासाठी पात्र असतील.

बारामतीतील हॉटेलची योजना काय?

बारामतीतील भिगवण रोडवर हॉटेल राजवाडा पार्क नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलनं ही लाडकी सुनबाई योजना आणली आहे. खरंतर ही एक जाहिरात आहे, यामध्ये सासुबाईच्या जेवणावर सुनबाईला जेवण मोफत मिळणार आहे. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी देखीला आहेत. यामध्ये सासुबाईला जेवायला घेऊन येणं आवश्यक आहे. सासूबाई जी थाळी जेवणार तीच थाळी सुनबाईला मोफत मिळणार. तसंच सर्वात महत्वाची अट म्हणजे घरातील किमान पाच लोकांनी जेवायला जाणं गरजेचं आहे.

त्यामुळं ही योजनेचा सारासार विचार करुन ती नेमकी तुमच्या फायद्याची आहे की तोट्याची याचा विचार करुन तुम्ही लाभ घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddiqui Case: हरियाणाच्या कतार तुरुंगात कट रचला, नंतर मुंबईत आले अन् घडवलं कृत्य, चौकशीत आरोपीनं सगळचं सांगितलं!

Pune Crime : बोपदेव घाट लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे; इतर दोन आरोपींचा शोध अद्याप सुरूच

Women's T20 World Cup: निराश नका होऊ! टीम इंडिया अजूनही Semi Final ला जाणार; दुसऱ्या पराभवानंतर वाचा कसं आहे गणित

Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्ध रोमांचक विजय, Semi-Final मध्येही मारली धडक; हरमनप्रीतची फिफ्टी व्यर्थ

Football India: व्हिएतनामविरुद्धचा सामना ड्रॉ; कोच मॅनोलो मार्क्वेझ यांच्या पहिल्या विजयाची प्रतीक्षा लांबली

SCROLL FOR NEXT