पुणे

पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेबाबत घेतला मोठा निर्णय 

ब्रिजमोहन पाटील

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षा विभागात सुधारणा करताना आणखीन एक पाऊल उचलले आहे. गुणपत्रिकेवर विद्यार्थ्यांचा फोटो छापण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे गैरप्रकारांना लगाम बसेल व सुरक्षेसाठी आणखीन एक पाऊल पुढे उचलले जाईल.

पुणे विद्यापीठाचा विस्तार पुणे नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये झालेला आहे. या विद्यापीठाशी संलग्न १ हजार महाविद्यालयांमध्ये सुमारे सात लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पुणे विद्यापीठातील बहुतांश अभ्यासक्रम सत्र पद्धतीनुसारचे आहेत. त्यामुळे वर्षातून दोन वेळा परीक्षा घेतली जाते. या परीक्षांचे नियोजन करणे, वेळापत्रक निश्चित करणे, क्रेडिट पद्धतीनुसार महाविद्यालयाकडून गुण मागविणे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करणे मोठी प्रक्रिया निरंतर सुरु असते. 

पुणे विद्यापीठाच्या 'एसपीपीयू एज्युटेक फाऊंडेशन'ने परीक्षा विभागासाठी पदवी प्रमाणपत्रांच्या डेटा प्रक्रिया व छपाई करिता 
'डीग्री डेटा प्रोसेसिंग अँड प्रिंटींग' हे साॅफ्टवेअर विकसीत केले आहे. डॉट मॅट्रिक प्रिंटरऐवजी लेझर प्रिंटर घेतले आहेत. यामध्ये एका मिनिटात जवळपास ६५ प्रिंट निघतात. या सॉफ्टवेअरच्या वापराने गुणपत्रिकांवर विद्यार्थ्यांचा फोटो प्रिंट करणे शक्य आहे. त्यासाठी गुणपत्रके वर फोटोची जागा निश्चित करणे सॉफ्टवेअरमध्ये त्याचे पॅनल तयार तयार करणेसाठी अधिकार मंडळाची व व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेतली जाणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

प्रायोगिक तत्वावर काही अभ्यासक्रम 
ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षेनंतर प्रायोगिक तत्वावर काही निवडक अभ्यासक्रमांच्या गुणपत्रिकांवर विद्यार्थ्यांचा फोटो छापला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर मार्च २०२१ च्या परीक्षेनंतर सर्व विद्यार्थ्यांना अशा गुणपत्रिका मिळू शकेल. 

यूजीसीचे २०११ ला निर्देश
परीक्षेचा सुधारणा संदर्भात यूजीसीने २०११ मध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते त्यामध्ये गुणपत्रिका व विद्यार्थ्यांचा फोटो छापावा फोटो छापावा विद्यार्थ्यांचा फोटो छापावा असेही नमूद केले होते. कोल्हापूर विद्यापीठात २०१४ पासून गुणपत्रिकेवर विद्यार्थ्यांचा फोटो छापला जातो.

हे असतील फायदे
- नाम साधर्म्यामुळे गुणपत्रिकांचा गोंधळ टाळता येईल
- फोटोमध्ये गुणपत्रिका आपल्या असल्याची विद्यार्थ्याला विद्यार्थ्याला असल्याची विद्यार्थ्याला विद्यार्थ्याला खात्री
- यूजीसीच्या सुरक्षा मानांकनाची अंमलबजावणी
- गुण बदलने, गुणपत्रिकेवर छेडछाड करने, डुप्लिकेट करणे हे प्रकार टळतील. 

परीक्षा विभागाने नवे तंत्रज्ञान स्विकारल्याने  गुणपत्रकेवर फोटो छापणे शक्य आहे. अधिकार मंडळ व व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेण्यासाठी लवकरच प्रस्ताव सादर केला जाईल. आपला फोटो गुणपत्रिका छापला गेल्याने विद्यार्थ्यांनाही त्याच्या समाधान असेल आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. -डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, पुणे विद्यापीठ

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT