Corona Vaccination sakal media
पुणे

लसीकरणातील योगदानासाठी परिचारिका भोसले यांचा सन्मान

भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून शहरातील सुमारे दीड लाख व्यक्तींचे लसीकरण केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लसीकरण मोहिमेतील योगदानासाठी एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाच्या लिबरल आर्ट्स विभागातर्फे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या परिचारिका ललिता भोसले यांचा सत्कार करण्यात आला. भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून शहरातील सुमारे दीड लाख व्यक्तींचे लसीकरण केले आहे. ‘‘आपण सगळेच विविध क्षेत्रात उदरनिर्वाहासाठी काम करत असतो. परंतु, आरोग्य क्षेत्रात काम करताना मानवतेची सेवा केल्याचे विशेष समाधान लाभते.

लसीकरणासारख्या राष्ट्रकार्यात आपला वाटा आहे, ही अभिमानास्पद भावना कायमच मनात राहील आणि अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देईल,’’ असे प्रतिपादन भोसले यांनी सत्काराला उत्तर देताना केले. त्यांचा सत्कार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस यांच्या हस्ते झाला. या वेळी लिबरल आर्ट्स, विधी, फाईन आर्ट्स, मीडिया आणि पत्रकारिता विभागाच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा पारासर आणि लिबरल आर्ट्स विभागाच्या प्रमुख डॉ. प्रीती जोशी उपस्थित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

0.05 सेकंद, 2 सेंटीमीटर... Trump यांच्यावर गोळीबार; अमेरिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट कसा ठरला?

Supreme Court : तुमच्याकडे कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर... सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अनेकांना होणार फायदा

लग्नाच्या १३ वर्षांनंतरही मुल का नाही? सतत एकच प्रश्न विचारणाऱ्यांना प्रिया बापटचं रोखठोक उत्तर, म्हणाली- मी आता..

'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कांटे की टक्कर अन् काटाजोड लढती; कोल्हापुरातील 'या' दहा मतदारसंघांत काय स्थिती?

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

SCROLL FOR NEXT