Corona In Pune 
पुणे

अधिकारी नॉट रिचेबल, ऐन कोरोना संकटात नगरसेवक आणि माजी आमदार हतबल

मदतीसाठी जबाबदार पालिका अधिकाऱ्यांना फोन करावा तर त्यातील बहुतांशी अधिकाऱ्यांचे नंबर बंद असतात.

सकाळ डिजिटल टीम

वडगाव शेरी : नगर रस्ता भागात कोरोनाचा कहर प्रचंड वाढला आहे. मदतीसाठी जबाबदार पालिका अधिकाऱ्यांना फोन करावा तर त्यातील बहुतांशी अधिकाऱ्यांचे नंबर बंद असतात. फोन लागलाच तर अधिकारी फोन घेत नाही. हा अनुभव फक्त सामान्य माणसालाच येतो आहे असे नाही. तर नगरसेवक, माजी आमदार यांनाही असाच अनुभव येत आहे. 'सकाळ' सोबत बोलताना माजी आमदार बापूसाहेब पठारे आणि काही नागरिकांनी हा अनुभव सांगितला. संपूर्ण व्यवस्थाच कोलमडून पडण्याअगोदार यात तातडीने सुधारणा करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. बापूसाहेब पठारे म्हणाले, पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना फोन केल्यावर ते फक्त पाहतो, बघतो एवढेच उत्तर देतात. प्रत्यक्ष काम मात्र करत नाहीत. कोरोनामुळे रोज पन्नास ते शंभर नागरिक विविध कारणांसाठी फोन करतात. लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला मदत करण्याची इच्छा असते. परंतु अधिकारी मात्र प्रतिसाद देत नाहीत. हा अनुभव आठ-दहा दिवसांपासून मी स्वतः घेत आहे. अनेक अधिकारी तर सुट्टी असल्यामुळे फोन बंद करून बसतात. तर काहीजण ड्युटी संपल्यावर पाच सहा वाजताच फोन बंद करतात. त्यामुळे जनतेसोबत आता लोकप्रतिनिधी सुद्धा हतबल झाले आहेत.

रेमडेसिव्हीर औषधासाठी जिल्हाधिकार्‍यांनी हेल्पलाईन सुरू केली. परंतु तो नंबर कायम बिझी असतो. त्या नंबरवर फोन लागत नाही. तहसिलदारांना फोन केला तर रेमडेसिव्हीर औषधाचा साठा नाही असं ते सांगतात. जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला, तर ते जबाबदारी झटकतात, हा अनुभव मी घेतला आहे. पालिकेतील आरोग्य प्रमुख आणि आरोग्य विभागातील इतर जबाबदार अधिकारी बघतो, करतो, सांगतो एवढेच बोलतात. असे कसे चालेल? पालिका आयुक्तांनी आणि राज्य शासनाच्या जबाबदार लोकप्रतिनिधींनी आता तरी यात लक्ष घालून की व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करावा. अन्यथा जनतेच्या संतापाचा बांध फुटेल. बहीण आणि दाजी साठी रॅमिडिस्वीअर औषधाची गरज आहे म्हणून तहसीलदार, पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी, विविध रुग्णालय आणि विविध औषध दुकाने येथे चकरा मारून थकलेले खराडीतील बाबा दरेकर म्हणाले, पालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर वावरे फोन घेत नाहीत, तहसीलदार यांचा फोन बंद आहे, मेडिकलवाले औषध नाही म्हणतात. आम्ही पुर्ण थकलो आहोत. काय करावे कळत नाही.

कल्याणीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अभिजीत साळवे म्हणाले, संकेतस्थळावरील एकही फोन नंबर सुरू नाही. औषध कंपन्यांनी दिलेले वितरकांचे फोन नंबर ही बंद आहेत. रुग्णालय आणि अधिकारी फोन घेत नाहीत. आमचे एक आप्तेष्ठ जहांगीर रुग्णालयात उपचार घेत आहेत. एवढ्या मोठ्या रुग्णालयात रेमडेसिव्हीर औषध नसल्यामुळे त्यांनी बाहेरून औषध आणायला सांगितले. आम्ही दोन दिवस सगळीकडे फिरलो परंतु औषध मिळाले नाही. वरील सर्व अनुभवांची खात्री करण्यासाठी तहसीलदार हवेली, पालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख, उप आरोग्य प्रमुख, विभागीय आरोग्य अधिकारी, विविध रुग्णालये, औषधाचे वितरक, जिल्हाधिकार्‍यांनी सुरू केलेली हेल्पलाइन, या सर्वांना सकाळ प्रतिनिधीने वारंवार फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणीही फोन घेतला नाही. संपर्क होऊ शकला नाही. विशेष म्हणजे संकेतस्थळावर बेडची उपलब्धता दाखवणारी माहिती अनेक रुग्णालयांनी सहा ते नऊ तास अद्यावतच केलेली नसल्याचे दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT