पुणे

डीम्ड कन्व्हेयन्स करायचंय; पण...

अनिल सावळे - सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘‘काही जुन्या सभासदांनी त्यांच्या सदनिकांची विक्री केली. या जुन्या व्यवहाराचे कागदपत्रे सब रजिस्ट्रार कार्यालयात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे दंडाची रक्‍कम भरा, असे सांगितले जाते; परंतु हे पैसे भरायचे कोणी? त्यामुळे डीम्ड कन्व्हेयन्सची प्रक्रिया रखडली आहे. सध्या जे सभासद अस्तित्वात आहेत, त्यांच्याकडून उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे आम्हाला डीम्ड कन्व्हेयन्स करून द्यावे...’’ 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बिबवेवाडी येथील शशिप्रभा सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष राजू गुजराथी ‘सकाळ’ शी बोलत होते. शहरात गृहनिर्माण सोसायट्यांची संख्या १७ हजारांहून अधिक आहे. त्यापैकी सुमारे दहा टक्‍के सोसायट्यांनीच मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेयनस) केले आहे. गृहनिर्माण सोसायटीला जमिनीचा मालकी हक्क प्राप्त व्हावा, यासाठी डीम्ड कन्व्हेयन्स आवश्‍यक आहे. डीम्ड कन्व्हेयन्स करून देणे बिल्डरला कायद्यानुसार बंधनकारक आहे; परंतु काही बिल्डरकडून टाळाटाळ केली जाते. अशा परिस्थितीत डीम्ड कन्व्हेयन्ससाठी सोसायट्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. या संदर्भात माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक किंवा संबंधित उपनिबंधक कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

डीम्ड कन्व्हेयन्ससाठी बिल्डर सहकार्य करीत नसल्यास त्याबाबत विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सोसायट्यांनी सहकार आयुक्‍त कार्यालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन माहिती भरून त्याची प्रत उपनिबंधक कार्यालयात द्यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर प्रक्रियेला आणखी गती येईल.
- नारायण आघाव, जिल्हा उपनिबंधक, पुणे

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हे आहेत फायदे
बांधकाम झालेल्या जमिनीवर मालकी हक्क  
सर्व व्यावसायिक फायदे  
तारण कर्जाला पात्र  
उर्वरित चटई निर्देशांक (एफएसआय) क्षेत्रावर मालकी हक्क 

शहरातील स्थिती (२०१० ते २०१९) 
१७,९८४ - गृहनिर्माण संस्था 
२०७८ - प्राप्त अर्ज
१८९५ - अंतिम आदेश प्राप्त
१८३ - सुनावणी सुरू
गृहनिर्माण सोसायट्यांना डीम्ड कन्व्हेयन्ससाठी अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ 
https://mahasahakar.maharashtra.gov.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT