Omkareshwar Mandir In Pune Under Water Esakal
पुणे

Omkareshwar Mandir Pune: श्रावणातील पहिल्याच सोमवारी भाविक ओंकारेश्वराच्या दर्शनाला मुकणार, अर्धे मंदिर पाण्याखाली

Khadakwasala Dam: गेल्या काही दिवसांपासून राज्यासह पुण्यात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणे भरलेली आहेत

आशुतोष मसगौंडे

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह पुण्यात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणे भरलेली आहेत. अशात खडवासला धरणातून मुळा-मुठा नदीत सतत सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे शहरातील नदी पात्रात असलेले ओंकारेश्वर मंदिर पाण्याखील गेले आहे.

दरम्यान ओंकारेश्वर मंदिरात पाणी शिरल्याने आज यंदाच्या श्रावण महिन्यातील पहिल्याच दिवशी भाविकांना दर्शनाला मुकावे लागणार आहे.

सध्याच्या परिस्थित पुराचे पाणी हे मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहचले आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात भाविकांना दर्शन घेता येणार नाही. मात्र, जर दुपारपर्यंत पुराचे पाणी ओसरले तर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले केले जाऊ शकते.

मुख्यमंत्री आज पुण्यात

गेल्या 15 दिवसांपासून पुण्यात सततच्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक भागांतील लोकांना पूराचा फटका बसला आहे. अशात हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

या सर्व परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी मागच्या पूरावेळी मृत्यू झालेल्या दोन तरुणांना दहा लाखांची मदत केली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री काय मदत जाहीर करणार याकडे पूरग्रस्तांचे डोळे लागले आहेत.

दुसरीकडे खडकवासला धरण प्रकल्पांतून सतत सोडत असलेल्या पाण्यामुळे पुणे शहरातील अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी शहरात निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष फिल्डवर जात नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महानगरपालिकेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करा, असे आवाहनही नागरिकांना त्यांनी केले आहे.

दरम्यान पुणे आणि परिसरातील पाऊस आता ओसरला असून येत्या काही तासांमध्ये परिस्थिती पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT