on gudi padwa share market sensex jump on the top 75000 volatality Sakal
पुणे

SENSEX : ‘सेन्सेक्स’चा वेलू गेला गगनावरी; शेअर बाजारात उच्चांक

गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारातील एक प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने आज दिवसभरातील व्यवहारांदरम्यान ७५ हजार अंशांचा सार्वकालिक उच्चांक नोंदवत यशाची गुढी उभारली.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारातील एक प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने आज दिवसभरातील व्यवहारांदरम्यान ७५ हजार अंशांचा सार्वकालिक उच्चांक नोंदवत यशाची गुढी उभारली.

भारतीय अर्थव्यवस्थेची वेगवान प्रगती, आगामी निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा स्थिर सरकार येण्याची अपेक्षा, अमेरिकी फेड व्याजदर वाढवण्याची शक्यता कमी झाल्याने भारतीय शेअर बाजारात देशांतर्गत आणि परकी गुंतवणूक वेगाने वाढत आहे. त्यामुळे गेले काही दिवस तेजीच्या वारूवर स्वार झालेल्या ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ने सातत्याने नवनवे उच्चांक नोंदवत गुंतवणूकदारांना मालामाल केले.

‘सेन्सेक्स’ने ९ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत १० हजार अंशांची वाढ नोंदविली. ‘सेन्सेक्स’ने आज ७५ हजारांच्या टप्प्याला स्पर्श करून महत्त्वाचा टप्पा गाठत, नव्या उच्चांकाकडे वाटचाल करण्याचा आशावाद जागविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT