navale pool accident sakal media
पुणे

नवले पुलावर विचित्र अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चार जखमी

कात्रज नवीन बोगद्यकडून आलेला एक कंटेनर पुढे चाललेल्या पिकउप टेम्पो ला धडक देऊन या अपघातामुळे संपुर्ण महामार्गावर वाहतूक कोंडी झाली

विठ्ठल तांबे

धायरी : मुंबई-बंगळुरु महामार्गावर नऱ्हे गावाच्या हद्दीत भूमकर पूल ते नवले पुला दरम्यान  संध्याकाळी पाचच्या सुमारास पिकअप टेम्पोला कंटेनरने धडक देऊन पिकअप टेम्पोने शेजरून जाणाऱ्या दोन बुलेट, अॅक्टिव्हा गाड्यांना पाठीमागू धडक देऊन पलटी झाला. या अपघातात एक महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या महिलेचा रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच चार जण जखमी झाले.

तर कात्रज नवीन बोगद्यकडून आलेला एक कंटेनर पुढे चाललेल्या पिकअप टेम्पोला धडक देऊन या अपघातामुळे संपुर्ण महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. पिकअप टेम्पोमध्ये बांधकाम व्यवसायात वापरण्यात येणारे साहित्य होते. साहित्य संपूर्ण रस्त्यावर अस्ताव्यस्त तर पुढे वाहतूक कोंडी झाली असता बघ्याची मोठी गर्दी झाली होती.

सातारा दिशेकडून मुंबई दिशेकडे निघालेल्या एका कंटेनरने पिकअप वाहनाला धडक दिली. त्यामुळे पिकअप वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तीन दुचाकींना त्याची धडक बसली. कंटेनर पिकअपला धडक दिल्यानंतर न थांबता पुढील दोन-तीन वाहनांना धडकला.

जखमींना नऱ्हे गावाचे उपसरपंच सागर भूमकर, डॉ. एन बी आहेर व परिसरातील कार्यकर्त्यांनी उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. घटनास्थळी सिंहगड वाहतूक विभाग व सिंहगड पोलीस दाखल झाले असून वाहतूक नियंत्रण सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT