Online Education Sakal
पुणे

विद्यार्थ्यांच्या हजेरीत ऑनलाइन वर्ग नापास; ६० ते ७० टक्के विद्यार्थी गैरहजर

शिक्षकांनी ऑनलाइन वर्ग सुरू केला की साधारणत: ३० ते ४० टक्के विद्यार्थीच ‘ऑनलाइन’ असल्याचे निरीक्षण शिक्षक नोंदवत आहेत.

मीनाक्षी गुरव

पुणे : कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेत इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग पुन्हा बंद करण्यात आले, या काळात ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात शिक्षकांनी ऑनलाइन वर्ग सुरू केला की साधारणत: ३० ते ४० टक्के विद्यार्थीच ‘ऑनलाइन’ असल्याचे निरीक्षण शिक्षक नोंदवत आहेत. (Online Education Attendance Of Student)

तसेच, ऑनलाइन वर्ग सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत विद्यार्थी स्क्रिनसमोरून पळत काढत आहेत, तर पालकच गृहपाठ लिहून घेत आहेत. तब्बल ६० ते ७० टक्के विद्यार्थी ‘ऑनलाइन’ वर्गात नियमितपणे हजेरी लावत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी ऑनलाइन शिक्षणासाठी राज्य सरकार आग्रही राहिल्यास विद्यार्थ्यांचे मोठं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती शिक्षक व्यक्त करत आहेत.

कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने राज्य सरकारने ...पासून शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी देखील सरकारने ‘शाळा बंद, ऑनलाइन शिक्षण सुरू’ अशी घोषणा केली. परंतु डिसेंबरपासून प्रत्यक्षात वर्ग सुरू झाल्याने आता कुठे शाळांची घडी पूर्ववत बसत होती. असे असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. त्यामुळे शिक्षकांना पुन्हा ऑनलाइनकडे वळावे लागले. एरवी शाळेत ८० ते ९० टक्के हजेरी लावणारे विद्यार्थी ऑनलाइन वर्गात हजर रहावेत, यासाठी शिक्षक विशेष प्रयत्न करत आहेत. परंतु आता मुलांनाच ऑनलाइन शिक्षणात फारसा रस राहिला नसल्याने त्यांचे ऑनलाइन वर्गात गैरहजेरीचे प्रमाणे धोकादायकरीत्या वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडत असल्याचे निदर्शनास येते.

‘‘मार्च २०२०मध्ये म्हणजेच कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑनलाइन शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. परंतु आता विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण रटाळवाणे वाटू लागल्याचे वास्तव आहे. ऑनलाइन वर्गात हजेरीची नोंद व्हावी, यासाठी विद्यार्थी ऑनलाइन येत आहेत, परंतु कॅमेरा आणि माईक चालू ठेवून इतरत्र व्यग्र होत आहेत. डिसेंबरमध्ये शाळा सुरू झाल्या त्यावेळी विद्यार्थ्यांची उपस्थिती ९० टक्क्यांपर्यंत होती. परंतु सध्या ऑनलाइन वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती ३० ते ४० टक्के इतकी आहे. शिक्षणाकडे लक्ष न दिल्यास विद्यार्थी शैक्षणिक व बौद्धिक दृष्ट्या कमकुवत राहतील.’’

- संजय सोमवंशी, मुख्याध्यापक, सुंदरबाई मराठे विद्यालय, खराडी

ऑनलाइन वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती ३० ते ३५ टक्के इतकी आहे. परंतु ऑनलाइन शिक्षणात मुलांचा फारसा रस नसून केवळ वर्गात हजर राहायचे म्हणून हे विद्यार्थी ऑनलाइन तासाला उपस्थित राहत आहेत. विद्यालयाचे नियोजन आणि पालकांची इच्छा म्हणून काही विद्यार्थी ऑनलाइन वर्ग जॉईन करतात. परंतु खऱ्या अर्थाने ऑफलाइन शिक्षणानेच विद्यार्थी उत्तमरीत्या शिकू शकणार आहे.’’

- नंदकुमार सागर, प्राचार्य, जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जेजुरी

‘‘कोरोनाच्या महामारीतही शाळांनी कंबर कसून सुरवात केली. लहान मुले ऑनलाइन शिक्षणात कंटाळून जातात, स्क्रिनसमोर बसत नाहीत, हे वास्तव आहे. परंतु त्यातही काही पूर्व प्राथमिक गटातील विद्यार्थी आवडीने ऑनलाइन शाळेत बसू लागले आहेत. जवळपास २० ते ३० टक्के विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणात उपस्थित नसतात. कोरोनामुळे इच्छा असूनही विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांचा सामाजिक विकास काहीसा खुंटत आहे, असे वाटते.’’

- माधुरी बर्वे, मुख्याध्यापिका, डी. ई. एस. पूर्व प्राथमिक शाळा

ऑनलाइन वर्गात गैरहजेरी वाढण्याची कारणे :

  • - ऑनलाइन शिक्षणासाठी पुरेशी साधने उपलब्ध नसणे

  • - या शिक्षण पद्धतीत अभ्यासक्रम योग्यरीत्या न समजणे

  • - स्क्रिनसमोर बसून अभ्यास करणे वाटतंय कंटाळवाणे

  • - छोट्याशा स्क्रिनवरून अभ्यासक्रम समजून घेणे जातंय अवघड

  • - ऑनलाइन शिक्षणासाठी साधन असले, तरीही इंटरनेट नसणे

  • - ऑनलाइन शिक्षणासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणे

ऑनलाइन वर्गात विद्यार्थ्यांच्या हजेरीचे अंदाजे प्रमाण (शिक्षकांच्या सांगण्यावरून) :

  • हजर विद्यार्थ्यांचे प्रमाण : ३० ते ४० टक्के

  • गैरहजर विद्यार्थ्यांचे प्रमाण : ६० ते ७० टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT