SBI bank Daund sakal
पुणे

Daund Crime : ऑनलाइन जुगार प्रकरणी स्टेट बॅंकेतील ८४ खाती गोठविली

ऑनलाइन गेम्स व जुगारासाठी दौंड येथील स्टेट बॅंक शाखेत चालू खाते उघडून त्या खात्यांमधील रकमेतून अवैध आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी ८४ बॅंक खाती गोठविण्यात आली.

प्रफुल्ल भंडारी

दौंड - ऑनलाइन गेम्स व जुगारासाठी दौंड येथील स्टेट बॅंक शाखेत चालू खाते उघडून त्या खात्यांमधील रकमेतून अवैध आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी ८४ बॅंक खाती गोठविण्यात आली आहेत. जुगाराचे आकडे घेणाऱ्या टोळीने बॅंकेच्या काही अधिकार्यांशी संगनमत करीत कागदोपत्री व्यवसाय दाखवून ही खाती उघडली होती.

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या पुणे जिल्ह्यातील दौंड शाखेत १ ऑक्टोबर २०२३ ते २१ मार्च २०२४ या कालावधीत ८४ चालू खाते उघडण्यात आले होते. भाजी विक्री, भंगार खरेदी व विक्री, पान पट्टी, टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स, कापड दुकान, केश कर्तनालय, लॉंड्री, लेडीज टेलर, घरगुती उद्योग, कापड दुकान, आदी कागदोपत्री व्यावसायिक प्रतिष्ठाण दाखवून ही खाती उघडण्यात आली.

पैसे आणि बक्षिसांचे आमिष दाखवून ऑनलाइन गेम्स आणि मटका जुगाराचे आकडे घेणार्या तरूणांच्या टोळीने ही चालू खाते उघडण्यासाठी आवश्यक दस्तऐवज, व्यवसाय नोंदणीचे प्रमाणपत्र, आदी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याचे काम केले. त्याचबरोबर बॅंक खाते उघडण्यासाठी किमान रक्कम देखील टोळीतील सदस्यांनी रोखीने पुरविली होती.

दरम्यान या खात्यांमध्ये ऑनलाइन गेम्स आणि मटका जुगाराचे जाळे असणार्यांकडून मुंबईसह देशभरातील विविध शहरांमधून किमान एक ते कमाल पाच लाख रूपयांपर्यंतच्या रकमा सहा महिन्यांच्या कालावधीत जमा झाल्या. सदर रक्कम जमा झाल्यानंतर दौंड मधील टोळीने त्या खातेदारांकरवी रकमा काढून स्वतः जवळ घेतल्या. साडेपाच महिन्यात एक कोटी पेक्षा अधिक रकमेचे व्यवहार झाले आहेत.

बॅंकेला या खात्यांवर व्यावसायासंबंधी आर्थिक व्यवहार होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी चौकशी केली. ऑनलाइन गेम्स आणि मटका जुगारासाठी या खात्यांचा वापर झाल्याचे चौकशीत आढळून आले. त्यानंतर ही ८४ संशयास्पद बॅंक खाती गोठविण्यात आली आहेत. या संशयास्पद खात्यांमधून साडेपाच महिन्यात एक कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार झाले.

या प्रकरणी बॅंकेचे शाखाधिकारी विपुल जैन यांनी दौंड पोलिस ठाण्यात अनिता शॅालोमन गुंजी (रा. गोवा गल्ली, दौंड) व इतर ८३ जणांविरूध्द फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार संबंधितांवर बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती तपास अधिकारी तथा दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT