पुणे - क्षमता १२०० प्रवाशांची अन् प्रवास केला फक्त १५ प्रवाशांनी, अशी स्थिती पुणे-लोणावळा मार्गावर पहिल्या दिवसाच्या शेवटच्या लोकल फेरीची सोमवारी झाली. दिवसभरात ४८०० प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता असलेल्या या लोकलमधून दिवसभरात चार फेऱ्यांत अवघ्या २१९ प्रवाशांनीच प्रवास केला... कारण, ही लोकल फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच आहे.
पुणे-लोणावळा मार्गावरील लोकल वाहतुकीला सोमवारी सुरूवात झाली. मुंबईच्या धर्तीवर लोकलमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला. त्यासाठी पुणे पोलिसांमार्फत प्रवाशांना क्यू-आर कोड असलेला पास उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या ४५ कार्यालयांशी पुणे पोलिसांनी संपर्क साधला होता. परंतु, लोकलला पुरेसे प्रवासी मिळाले नसल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आले. ज्या प्रवाशांकडे स्वतःची वाहने नाहीत त्यांनी लॉकडाउनच्या काळात पर्यायी व्यवस्था केली. ती थेट त्यांच्या कार्यालयापर्यंत असल्यामुळे ते लोकलकडे वळाले नाहीत. पीएमपीची वाहतूक ३ सप्टेंबरपासून सुरू झाली. त्यामुळे काही प्रवासी पीएमपीकडे वळाले आहेत. त्यामुळेही लोकलला फारसे प्रवासी मिळाले नाहीत. विद्यार्थी, नोकरदार, लहान व्यावसायिक आदी प्रामुख्याने लोकलचा वापर करतात. परंतु, त्यांना प्रवास करण्यासाठी बंदी असल्याकडेही रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले.
दौंडपर्यंत लोकल सोडण्याची मागणी
पुणे-लोणावळा मार्गावरील लोकल दौंडपर्यंत सोडावी, अशी मागणी दौंड- पुणे प्रवासी संघाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे निवेदनाद्वारे सोमवारी केली. दरम्यान, दौंडचे आमदार राहुल कुल यांनीही प्रवाशांसमवेत गुप्ता यांची भेट घेऊन अत्यावश्यक सेवेच्या प्रवाशांसाठीची लोकल दौंडपर्यंत सोडावी, अशी मागणी केली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
फक्त ७०० प्रवासी घेण्याचे धोरण
पुण्यातून सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी सुटलेल्या लोकलमध्ये ६२, तर सायंकाळी ६ वाजून २ मिनिटांनी सुटलेल्या लोकलमध्ये ७५ प्रवासी होते. तर, लोणावळ्याहून सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी सुटलेल्या लोकलमध्ये ७५ प्रवासी होते आणि सायंकाळच्या ५ वाजून ३० मिनिटांनी सुटलेल्या लोकलमध्ये १५ प्रवासी होते, अशी माहिती रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली. एका लोकलची क्षमता १२०० प्रवाशांची असून, त्यात सध्या ७०० प्रवासी घेण्याचे रेल्वेचे धोरण आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.