पुणे - राज्यातील संशयित कोरोना बाधितांपैकी फक्त ६.८४ टक्के रुग्णांना ऑमिक्रॉन प्रभेदाचा (व्हेरियंट) संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आजवर विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून ४३० प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २१ नमुन्यांचा अहवाल प्रलंबीत असून, उरलेल्या ४०९ नमुन्यांपैकी २८ नमुन्यांमध्ये ओमिक्रॉन प्रभेदाची पुष्टी झाली आहे.
राज्यात मंगळवारी आठ नवे ओमिक्रॉन बाधित रूग्ण आढळले. त्यामध्ये मुंबईतील सात तर वसई-विरार येथील एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यात एक डिसेंबरपासून मुंबई, पुणे आणि नागपूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. तसेच एक नोव्हेंबरनंतर राज्यात दाखल झालेल्या सर्वच प्रवाशांचे सर्वेक्षण करून कोरोना निदान करण्यात येत आहे. त्यातील बाधित रुग्णांचे नमुने प्रयोगशाळांत जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविले जात आहे. आजवरचे सर्वेक्षण आणि कोरोना बाधितांच्या तुलनेत ओमिक्रॉन या नव्या प्रभेदाचा संसर्ग झालेल्यांची संख्या कमी आहे. तसेच आजवरच्या एकाही बाधितामध्ये तीव्र लक्षणे दिसत नाही. बहुतेकांमध्ये लक्षणे नाही. तर निवडक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. राज्यातील २८ पैकी नऊ रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
ओमिक्रॉन बाधितांची राज्यातील संख्या -
मुंबई - १२
पिंपरी चिंचवड - १०
पुणे मनपा - २
कल्याण डोंबिवली - १
नागपूर - १
लातूर - १
वसई विरार - १
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.