सद्यःस्थितीत पुणे शहरात एकूण फक्त ३४१ सक्रिय कोरोना रुग्ण शिल्लक राहिले आहेत.
पुणे - कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत म्हणजेच सुमारे वर्षभरापूर्वी कोरोना उपचारास बेड (खाट) मिळण्यासाठी वणवण भटकाव्या लागणाऱ्या पुणे शहरात (Pune City) बुधवारी (ता. १६) रुग्णालयात (Hospital) दाखल होऊन उपचार (Treatment) घेणारे अवघे आठ कोरोना रुग्ण (Corona Patients) उरले आहेत. त्याचवेळी जिल्हा परिषद आणि नगरपालिका हद्दीतील उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. या दोन्ही क्षेत्रात सध्या एकही कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल नसल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोरोना आकडेवारीच्या अहवालातून उघड झाले आहे.
सद्यःस्थितीत पुणे शहरात एकूण फक्त ३४१ सक्रिय कोरोना रुग्ण शिल्लक राहिले आहेत. यापैकी आठ जण विविध रुग्णालयात उपचार घेत असून, उर्वरित ३३३ जण गृह विलगीकरणात आहेत. एकूण पुणे जिल्ह्यातही हीच स्थिती आहे. सध्या जिल्ह्यात एकूण केवळ ७८१ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी फक्त २८ जण रुग्णालयात दाखल असून उर्वरित ७५३ जण गृहविलगीकरणात आहेत.
दरम्यान, बुधवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात फक्त ६८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसातील एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील २१, पिंपरी चिंचवडमधील १०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २०, नगरपालिका हद्दीतील १५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील दोन रुग्ण आहेत. याउलट दिवसभरात १८१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १२५ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३६, नगरपालिका हद्दीतील १० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत.
क्षेत्रनिहाय शिल्लक सक्रिय कोरोना रुग्ण
पुणे शहर --- ३४१
पिंपरी चिंचवड --- १२०
जिल्हा परिषद कार्यक्षेत्र --- १७१
नगरपालिका क्षेत्र --- १२७
कॅंटोन्मेंट बोर्ड --- २२
एकूण पुणे जिल्हा --- ७८१
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.