Khadakwasala-Dam sakal
पुणे

Water Storage : पुणे शहराला दोन महिने पुरेल इतकेच पाणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांमध्ये मिळून एकूण ६.७० टीएमसी म्हणजे २३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा २.३० टीएमसीने पाणीसाठा कमी आहे. शहराला दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.

मागील वर्षी सरसरीपेक्षा कमी पावसामुळे पानशेत, खडकवासला साखळी प्रकल्पातील चारही धरणे कशीबशी १०० टक्के भरली. मात्र त्यानंतर परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने धरणात पुन्हा पाणीसाठा जमा झाला नाही. त्यामुळे सुरुवातीपासूनच खडकवासला प्रकल्पात कमी पाणीसाठा होता.

सद्यःस्थितीत टेमघर धरणे रिकामे झाले असून, धरणात अवघे ४.९९ टक्के म्हणजेच ०.१९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी खडकवासला साखळी प्रकल्पातील धरणात नऊ टीएमसी म्हणजेच ३०.८७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा प्रकल्पात ६.७० टीएमसी म्हणजे २३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

आतापासूनच नियोजन करण्याची गरज

पुणे शहराला १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा खडकवासला प्रकल्पात राखीव ठेवला आहे, असा दावा पाटबंधारे आणि महापालिका प्रशासनाकडून सुरुवातीपासूनच करण्यात येत आहे. मात्र मागील काही वर्षांपासूनचा पावसाचा अंदाज पाहता मॉन्सूनचे वेळेवर आगमन होते. मात्र, त्यानंतर पाऊस लांबणीवर पडतो. त्यामुळे शहरासमोर पाणीकपातीचे संकट उभे राहत आहे. त्यामुळे पाण्याचे आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT