वालचंदनगर : भारताच्या महत्वकांक्षी गगणयान मोहिमेमध्ये वालचंदनगर कंपनीचा सहभाग असून गगणयानाच्या बुस्टरच्या निर्मिती यशस्वीपणे केली असून बुस्टरची चाचणी वालचंदनगरमध्ये होणार आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) २०२२ च्या सुमारास गगणयान अवकाशामध्ये सोडणार आहे. या मोहिमेमध्ये ३ भारतीय अंतराळवीर ७ दिवस अवकाशामध्ये राहण्याचे नियोजन आहे. ही मोहिम यशस्वी झाल्यास भारत जगामध्ये यशस्वी मोहिम राबविणारा चौथा देश ठरणार आहे.संपूर्ण जगाचे या मोहिमेकडे लक्ष लागले आहे. या मोहिमेसाठी आवश्यक असणारे बुस्टर तयार करण्याचे काम वालचंदनगर व देशातील इतर कंपन्या करीत आहेत. बुस्टरचा व्यास ३.३ मीटर व्यास व उंची २० मीटरपेक्षा जास्त असून यामध्ये नॉझल एन्ड सेगमेंट, हेडअॅन्ड सेगमेंट व मिडल सेगमेंटचा समावेश आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
गगणयानामध्ये ३ अंतराळावीर जाणार असून बुस्टरची चाचणी महत्वाची असून इतर यानापेक्षा गगणयानाचे बुस्टरची क्षमता ही वेगळी आहे. याची चाचणी करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारली असून बुस्टरची चाचणी करताना अतिशक्तीशाली दाबाद्वारे चाचणी करण्यात येणार आहे. अशी यंत्रणा उभी करणारी वालचंदनगर ही देशातील एकमेव कंपनी आहे. गगणयानाचे बुस्टर व चाचणी करण्याची यंत्रणा तयार करण्यासाठी वालचंदनगर कंपनीचे १९ इंजिनिअर व २२५ कामगार गेल्या १८ महिन्यापासुन अविरत काम करीत होते.तसेच बुस्टरची निर्मितीचे काम ही गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. गगणयानाचे उड्डानाच्या वेळी ६ बुस्टर कार्यरत असणार असून बुस्टरमुळे यान हवेमध्ये झेपावले जाते. इस्त्रोचे संचालक एस.सोमनाथ यांच्या हस्ते शुक्रवार (ता.१८) रोजी बुस्टरची चाचणी होणार आहे.
गगणयानासाठी विशेष यंत्रणा बनविण्याचे काम...
इतर यानाच्या पेक्षा गगणयान वेगळे असणार आहे. यामध्ये ३ अंतराळवीर अवकाशामध्ये झेपावणार आहेत. यानाच्या उड्डानाच्या वेळी काही बिघाड झाल्यास अंतराळवीरांना यानापासुन तातडीने वेगळे करण्याची क्युएसकेएफ यंत्रणेसाठीचे उपकरण बनविण्याचे काम वालचंदनगरमध्ये सुरु आहे.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
देशासाठी काम करीत असल्याचा अभिमान...
गगणयाम मोहिमेसाठी आम्ही वेळेमध्ये काम करीत आहोत. बुस्टरच्या चाचणी यंत्रणा उभारत असताना लॉकडाउन व पावसाचा व्ययत्य आला. मात्र आमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेमध्ये काम पूर्ण केले असून गगणयानाच्या मोहिमेसाठी काम करीत असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे वालचंदनगर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यस्थापकीय संचालक चिराग दोशी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.