पुणे

Ajit Pawar: "ते भाजपचे कधीच होणार नाहीत," पुण्यात भाजपकडून अजित पवारांना विरोध कायम!

सकाळ डिजिटल टीम

Latest Pune News: शिरूर - हवेली विधानसभेची जागा भाजपलाच राहिली पाहिजे. पक्षाने ही उमेदवारी देताना निष्ठावंतांना उमेदवारी द्यावी. ज्यांच्या मनात राष्ट्रवादीचे विचार आहेत ते भाजपचे कधीच होणार नाही. याचा विचारही पक्षाने करावा. असा सूर भाजपच्या  पदाधिकाऱ्यानी काढला. काही भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज वाघोलीत पार पडली. या बैठकीतून भाजपची अंतर्गत गटबाजी दिसून आली

                         या बैठक साठी माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पलांडे,किसन मोर्चाचे उपाध्यक्ष दादा सातव, रोहिदास उंद्रे, प्रवीण काळभोर, संजय पाचंगे, प्रवीण काळभोर, पुनम चौधरी, अनिल सातव,केतन जाधव, रामदास हरगुडे आदी उपस्थित होते.

जयश्री पलांडे म्हणाल्या, फक्त काही ठेकेदार लोकांना बरोबर घेऊन आमदार होऊ शकत नाही, गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून काम करावे लागेल, शिरूर हा पहिल्या पासूनच भाजपचा व संघाचा बालेकिल्ला आहे. म्हणूनच भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांला संधी मिळायला हवी.

रोहिदास उद्रे म्हणाले, शिरूर हवेलीत आताची परिस्थिती पक्ष वाढवायचा की गट वाढवायची अशी झाली आहे.या परिस्थितीमुळे आपला आमदार कसा होणार. नुसता पैसा चालणार नाही. आताच्या टोळीचा भाजपमधील सच्चा कार्यकर्ता काम करणार नाही. आमच्याबाबत मनात तिरस्कार आहे.

भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी इतर मांडलेले मुद्दे --

* जागा राष्ट्रवादीला गेली तर भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांचे कष्ट वाया जातील.

*. मिटिंगला बुथ प्रमुखांना डावलले जात असल्याचा आरोप.

* संभाव्य इच्छुकांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे.

*. तालुका अध्यक्षाला स्वताच्या मनाने काम करता येत नाही,तो फक्त बाहुला बनला आहे.

* शिरूर हवेलीचे निवडणूक संयोजक संदीप भोंडवे हे बैठकीला उपस्थित राहणार होते. मात्र त्यांनी ऐनवेळी बैठक अनधिकृत असल्याचा मेसेज पाठविला.

तर अशोक पवार यांचा विजय सुककर

भारतीय जनता पार्टीने प्रदीप कंद यांना शिरूर हवेली विधानसभेतून उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीचे अशोक पवार यांचा विजय सुककर होईल. अशी प्रतिक्रिया काही भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संभाजी छत्रपतींचा ताफा मुंबईत अडवला, गाडीवर चढून भाषण! म्हणाले, "पटेलांचा पुतळा झाला पण..."

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर Sachin Tendulkar ची लक्ष्यवेधी पोस्ट

Dussehra Fashoin Tips: यंदा महानवमी अन् दसऱ्याला 'या' पद्धतीने करा तयारी, सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतील

Tirupati Balaji Prasad Video: तिरुपती बालाजीच्या प्रसादात आता आढळले किडे, पाहा धक्कादायक व्हिडिओ

रहस्यामुळे खिळवून ठेवणारा थरारपट

SCROLL FOR NEXT