Padmini stumps sakal
पुणे

भवानी पेठेतील पद्मिनी स्टंप हजारो श्वानांच्या आधारवड

गुरुनानकनगरमध्ये भटक्या श्वानांना दिले हक्काचे घर

मोहिनी मोहिते

कॅन्टोन्मेंट : दगडगोटे आणि काठ्यांनी मारहाण, सततची हाड हाड, चतकोर तुकट्यासाठी भटकंती ज्यांच्या नशिबी आली आहे. त्या श्वानांना भवानी पेठेतील गुरूनानक नगर येथील मिशन पॉसिबल या संस्थेच्या माध्यमातून पद्मिनी स्टंप यांनी मायेचा आधार देत पोटभर खाऊ खालण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी भवानी पेठेतील गुरुनानकनगर येथील तीन मजली गुलशन महलमध्ये एक नव्हे, दोन नव्हे चक्क हजारो श्वानांचा सांभाळ करीत आहेत. खाऊ-पिऊ घालण्यावर त्या थांबल्या नाही, तर त्यांनी लेकराप्रमाणे उपचारही सुरू केले आहे. या संधीची श्वानप्रेमी स्वतःच्या श्वानावरही फुकटात उपचार करून घेत आहेत, ही बाब निश्चितच अधोरेखित करणारी आहे.

पद्मिनी स्टम्प म्हणाल्या की, श्वानांना पाहून अनेकांना भीती वाटते, तर अनेकांना आपुलकीही वाटते, ती फक्त वरवरची असते. प्रेमापोटी काहींकडून सांभाळ केला जातो. मात्र, जखमी झाले किंवा वयोवृद्ध झाले किंवा आजारी पडले की रस्त्यावर सोडून देतात. अशा निराधार श्वानांचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. प्राणीमात्रावर भूतदया करावी, हे वाक्य फक्त बोलून दाखवण्यापुरतेच आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अपघातग्रस्त जखमी, लंगडे, आंधळे, कीड लागलेल्या या मुक्या प्राण्यांवर मोफत उपचार करून मागिल २० वर्षांहून अधिक काळ त्या श्वानांसाठी आधारवड बनल्या आहेत. सोबत कॅन्सर स्पेशालिस्ट डॉ. रवी कसबेकर यांचे मोलाचे मोठे सहकार्य असल्याने हे काम करणे शक्य झाले आहे.

स्वतः च्या बंगल्यात हजारो श्वान व इतर प्राण्यांना ठेवणं शक्य नव्हते. यावेळी अनेक अडचणी तोंड करून उभ्या होत्या. अशा परिस्थितीत जागेचा अभाव ओळखत देवदूतासारखे धावून येणारे ॲड. अमरसिंग जाधवराव यांनी सासवड जवळील जाधववाडी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे शेल्टरसाठी स्वतःच्या मालकीची दोन एकर जागा वापरण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिली आहे. या शेल्टरमध्ये एक हजारांहून अधिक श्वान, चारशे मांजरी, गाई, म्हशी अशी अनेक मुके प्राणी याठिकाणी आश्रयास आहे. तसेच पाच हजारांहून अधिक श्वानांना बरे करून त्यांना हक्काचा आश्रय मिळवून दिला आहे.

1980 ते 2000 दरम्यान पद्मिनी या दुबईमध्ये एकमेव ब्युटी मॉडेल च्या विजेता होत्या. तीन मुले झाल्यावरही त्यांनी 14 वेळा स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यावेळी राज्यभरात त्यांचे कौतुक करण्यात आले होते. सध्या त्यांचे पती, मुलगा, मुलगी व नातवंडे असं अख्ख कुटुंब सदस्य दुबई येथे वास्तव्यास आहे. मात्र, प्राण्यांच्या प्रेमापोटी स्टंप लेकरे समजून विनातक्रार श्वानांची सेवा करीत आहेत. दुसरा मुलगा दुबई येथे एक्सीडेंट मध्ये अपघातात मरण पावल्याने त्यांच्या मनावर ही मोठा आघात झाला होता. मात्र, दादा वासवानी यांच्या मार्गदर्शनाने त्यांना जगण्याची नवी उमेद मिळाली आली. त्यानंतर त्यांनी श्वानांचा सांभाळ करण्याचे कार्य सुरू केले. दररोज अडीचशे ते तीनशे किलो अन्न रस्त्यावर भटकणाऱ्या श्वानांसह इतरही प्राण्यांना देत आहेत. चांगले काम करीत असताना अडचणींचा डोंगर उभा राहतोच. मात्र, तक्रार न करता नेटाने काम केल्यानंतर अडथळे आपोआप दूर होतात.

लता मंगेशकर यांनी पद्मिनी नाव ठेवले...

भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांनी स्टंप यांचे 'पद्मिनी'

नाव ठेवल्याचे सांगत त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्टंप यांच्या मातोश्री एक जुनी अभिनेत्री होत्या. रूपकुमारी ऊर्फ गुलशन या नावाने त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये परिचित होत्या. अभिनेत्री मधुबाला,सुनील दत्त, नरगिस, सुरैया, राज कपूर, महिंद्र कपूर यांच्यासारख्या अनेक कलाकारांबरोबर त्यांना काम करायची संधी मिळाली. त्याचबरोबर लोकांची सेवा करणे व सढळ हाताने मदत करणे या कार्यात त्यांनी ही स्वतःला झोकून दिले होते.

हॉस्पिटल उभारण्याची मागणी

चौकट: रस्त्यावर श्वान, मांजरी व इतर भटक्या प्राण्यांची संख्या वाढत चालली आहे. जागेचा अभाव , पुरेसे कर्मचारी असल्याने त्यांचा सांभाळ करणे अनेक संस्था व प्राणी प्रेमींना कठीण जात आहे. अशावेळी केंद्र व राज्य सरकारने या भटक्या प्राण्यांच्या सांभाळ व उपचाराकरिता एखादे आश्रयस्थान व मोठे स्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे प्राण्यांच्या जीवनाचा व आरोग्याचा प्रश्न ही सुटण्यास मदत होईल. अशी मागणी पद्मिनी स्टंप व डॉ रवी कसबेकर यांनी सकाळच्या माध्यमातून केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT