Panchnama Sakal
पुणे

पंचनामा - चार आण्याची छत्री अन् बारा आण्याची दुरुस्ती!

सु. ल. खुटवड

‘‘मी शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनला चाललोय. तिथे फुकट छत्री दुरुस्त करून मिळते. त्यामुळे उशीर होईल.’’ जनुभाऊंनी म्हटले. त्यावर मात्र सरस्वतीबाई कावऱ्याबावऱ्या झाल्या.

‘‘अगं छत्री दुरुस्त करून येतो. परत यायला दोन-तीन तास लागतील,’’ जनुभाऊंनी छत्री काखोटीला मारत म्हटले. ‘‘काय तरीच काय! नाक्यावरून छत्री दुरुस्त करून आणायला एवढा वेळ कशाला लागतोय?’’ सरस्वतीबाईंनी म्हटले. ‘‘मी शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनला चाललोय. तिथे फुकट छत्री दुरुस्त करून मिळते. त्यामुळे उशीर होईल.’’ जनुभाऊंनी म्हटले. त्यावर मात्र सरस्वतीबाई कावऱ्याबावऱ्या झाल्या.

‘‘हो, कात्रजवरुन शिवाजीनगरला जाण्यासाठी बसचं नाहीतर रिक्षाचं भाडं किती होईल, याचा तरी विचार करा. त्यापेक्षा नाक्यावर...’’ त्यांना मध्येच थांबवत जनुभाऊ म्हणाले, ‘‘वेळेचा आणि पैशांचा विचार करणे हे माझ्या तत्वात बसत नाही. एखादा पक्ष कोणती तरी योजना फुकट राबवत आहे ना. मग तिचा लाभ नको घ्यायला. संयोजकांना प्रोत्साहन देणे हे सर्वसामान्य नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे.

काही महिन्यांपूर्वी शनिपाराजवळ एक पक्ष झाडूचे वाटप करीत होता. त्यावेळी रांगेत तीन तास उभे राहून मी झाडू आणला होता, हे विसरलीस वाटतं?’’ सरस्वतीबाई पुढं काही बोलल्या नाहीत. अर्थात बोलून काही उपयोग नव्हता. उलट तासभर तत्त्व, ‘नैतिकता’, ‘हक्क आणि कर्तव्य’ या विषयांवर ऐकून घ्यावे लागले असते. मात्र बराच वेळ वाट पाहूनही बस न मिळाल्याने ते रिक्षाने निघाले. पाऊण तासात ते काँग्रेस भवनला पोचले. रिक्षाचालकाच्या हातावर १४० रुपये टेकवून जनुभाऊ खाली उतरले. त्यानंतर कारागिराच्या हाती छत्री सोपवून ते निवांत झाले. तिथे उपस्थित असलेल्या एका पदाधिकाऱ्याबरोबर त्यांनी चर्चा करायला सुरुवात केली.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

‘‘मोफत छत्रीदुरुस्ती हा उपक्रम खूप चांगला आहे. पण तो एकाच ठिकाणी असल्याने गैरसोयीचा आहे. आता मी कात्रजवरुन खास छत्री दुरुस्तीसाठी आलो. त्यासाठी मला दोन्ही बाजूचे रिक्षाभाडे धरुन २८० रुपये खर्च आला. वास्तविक तुम्ही वॉर्डनिहाय हा उपक्रम राबवायला हवा. आता वारजे किंवा हडपसरमधील व्यक्तीला येथे येणे परवडणारे आहे का? याचा विचार व्हायला हवा. शहरात किमान शंभर ठिकाणी तुम्ही छत्री दुरुस्तीची उपकेंद्रे स्थापन करायला हवीत. तसेच ‘एका कॉलवर छत्री दुरुस्ती’ हाही उपक्रम राबवा. शहरातील कोणत्याही नागरिकाने फोन केल्यास अर्ध्या तासात त्याला घरपोच सेवा मिळायला हवी. तसेच छत्री एक्सचेंज ऑफरही तुम्ही पावसाळ्यात द्यायला हवी.’’ जनुभाऊंचा बोलण्याचा पट्टा जोरात सुरु होता. पदाधिकारी मात्र हैराण झाला होता. तेवढ्यात छत्री दुरुस्त झाल्याचा पुकारा झाल्याने पदाधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.

छत्री ताब्यात घेतल्यावर जनुभाऊ पदाधिकाऱ्याला म्हणाले, ‘‘छत्री दुरुस्तीप्रमाणेच तुम्ही मोफत चप्पल दुरुस्ती आणि बूट पॉलिश हा उपक्रमही राबवायला हवा. तसेच उसवलेली किंवा फाटकी कपडे शिवून देण्यासाठी मोफत शिवणकला, दुचाक्यांमध्ये भरा मोफत हवा, मोफत केस कर्तनालय असेही उपक्रम तुम्हाला राबवता येतील. मात्र ते एकाच ठिकाणी सुरु करू नका. शहरात व उपनगरांत त्यांची उपकेंद्रे सुरु करा. नाहीतर २८० रुपये रिक्षाभाडे देऊन तुमच्या योजनांचा लाभ घेणे परवडणारे नाही. नाहीतर ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ असं व्हायचं.’’ त्यानंतर पॉझ घेत ते म्हणाले, ‘‘या मसाल्यावरुन आठवलं, तुम्ही ‘मोफत कोंबडी...’’ मात्र जनुभाऊंचं बोलणं पूर्ण होण्याआधीच पदाधिकाऱ्याने त्यांना कोपरापासून नमस्कार घातला आणि तो लगबगीने दुसरीकडे निघून गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT