Literacy Assessment Test Sakal
पुणे

Literacy Assessment Test : मूल्यमापन चाचणी उत्तीर्ण होणारे ठरणार ‘साक्षर’; राज्यात सहा लाखांहून अधिक निरक्षरांनी दिली चाचणी

नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यात सहा लाख २१ हजार निरक्षरांची नोंदणी करण्यात आली. केंद्र सरकारच्या आदेशानुसार नोंदणी केलेल्या निरक्षरांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवारी (ता. १७) घेण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यात सहा लाख २१ हजार निरक्षरांची नोंदणी करण्यात आली. केंद्र सरकारच्या आदेशानुसार नोंदणी केलेल्या निरक्षरांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवारी (ता. १७) घेण्यात आली. चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्यांना ‘साक्षरता प्रमाणपत्र’ देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवभारत साक्षरता कार्यक्रम २०२२ ते २०२७ या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. त्यात १५ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या निरक्षरांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान,

जीवनकौशल्ये विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात लेखन, वाचन, संख्याज्ञानासह आर्थिक साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्यनिगा, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण अशा घटकांचा समावेश आहे. नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, गटस्तरीय, शाळा स्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली होती.

त्याअंतर्गत निरक्षरांची नोंदणी केलेली प्रत्येक शाळा हे मूल्यमापन चाचणीचे परीक्षा केंद्र होते. या केंद्रावर रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत ही चाचणी घेण्यात आली. वाचन, लेखन, संख्या ज्ञान या तीन भागांसाठी प्रत्येकी ५० अशा १५० गुणांची चाचणी झाली.

चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागात किमान ३३ गुण आवश्यक आहेत. प्रत्येक भागाची चाचणी तीन तासांची होती. या चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थेमार्फत(एनआयओएस) ‘साक्षरता प्रमाणपत्र’ देण्यात येणार आहे.

निरक्षरांना साक्षर करण्यासाठी राबविण्यात आलेल्या कार्यक्रमातंर्गत राज्यात शेवटच्या क्षणापर्यंत सहा लाख ५४ हजार निरक्षरांची नोंदणी झाली. या आधी ही संख्या सहा लाख २१ हजारांपर्यंत होती. राज्यात शिक्षक, विद्यार्थी यांच्या मदतीने निरक्षरांना साक्षरतेचे धडे देण्यात आले.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार नोंदणी केलेल्या निरक्षरांची ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी’ रविवारी घेण्यात आली. या चाचणीत उत्तीर्ण होणारे साक्षर गटात मोडले जाणार आहेत. त्यांना राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थेच्या (एनआयओएस) वतीने ‘साक्षरता प्रमाणपत्र’ दिले जाईल.

- डॉ. महेश पालकर, संचालक, शिक्षण विभाग (योजना)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidate First List : विधानसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पुण्यातून एकमेव धंगेकरांचं नाव; वाचा संपूर्ण यादी

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेसचा 'हा' उमेदवार; २०१४ मध्ये दिली होती लढत

Burger: बर्गरमधून विषाणूचा प्रसार; ४९ जणांना बाधा, एकाचा मृत्यू, १० राज्यांमध्ये फैलाव

Maharashtra Assembly Election 2024 : भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना संधी दिलेली नाही, फिल्टर लावूनच उमेदवारांची निवड - जयंत पाटील

Mohol Assembly Election : निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आमदार यशवंत यांनी माने यांनी दाखल केली उमेदवारी

SCROLL FOR NEXT