Patil-Kulkarni Farm Atlanta USA Viral Video Esakal
पुणे

काळ्या मातीत मातीत...! पुण्याच्या शेतकऱ्याने अमेरिकेत फुलवली शेती, पाहा गावाच्या आठवणीत बुडवणारा Video

Patil-Kulkarni Farm: या मराठमोळ्या कपलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेक युजर्स त्यांचे कौतुक करत आहेत.

आशुतोष मसगौंडे

अलिकडील काळात मराठी माणूस जगभरात नाव गाजवत आहे. अशी अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. आता महाराष्ट्रातील असलेले पाटील-कुलकर्णी हे मराठमोळे कपल सध्या चर्चेत आले आहे, ते त्यांच्या शेतीमुळे. त्यांची ही शेती साधीसुधी नाही तर अमेरिकेतील अटलांटा येथे फुलवलेली आहे. हे जोडपे मूळचे पुण्याचे असून अमेरिकेत आयटी इंजीनिअर म्हणून काम करतात आणि शेतीही करतात.

या मराठमोळ्या कपलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेक युजर्स त्यांचे कौतुक करत आहेत.

दरम्यान व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हे पाटील-कुलकर्णी कपल म्हणत आहे की, त्यांनी अमेरिकेतील अटलांटमध्ये एक छोटंसं गाव वसवले आहे. त्यांनी तेथे शेत खरेदी करून त्यामध्ये कोंबड्या, शेळ्या-मेढ्या, गायी, घोडे आणि एक गाढवही पाळले आहे.

हे जोडपे त्यांना लागणारा सर्व भाजीपाल इथेच पिकवते. त्यांनी पिकवलेल्या शेतीची झलकही व्हायरल व्हिडओमध्ये पाहायला मिळत आहे.

या जोडप्याने आपल्या शेतात फुलांची शेतीही फुलवली असून, त्यामध्ये मधमाशी पालन करत ते मध निर्मितीही करतात.

दरम्यान या जोडप्याने त्यांच्या शेतात अमेरिकन नागरिकांसाठी शेती पर्यटनही सुरू केले आहे. येथे ते येणाऱ्या पर्टयटकांना महाराष्ट्रीय जेवणाची चवही चाखवतात. याचबरोबर लांबून येणाऱ्या पर्यटकांसाठी त्यांनी राहण्याची सोयही केली आहे.

पाटील-कुलकर्णी कपलच्या या कामाचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. त्यांचे व्हिडिओ पाहूण एक युजर म्हणाला, "आपली महाराष्ट्राची मराठी माणसाची मराठी संस्कृती खूप छान जपता, दुसऱ्या देशात जाऊन येवढे करणे शक्य नाही ते तुम्ही करत आहे. खरच तुमच्या कार्याला माझा सलाम."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

CNG Price Hike: महागाईचा झटका! गॅस कंपनीकडून सीएनजीच्या दरात मोठी वाढ, काय आहेत नवीन दर?

Prakash Ambedkar: निकालानंतर मविआ की महायुती? वंचित कुणाशी युती करणार? प्रकाश आंबेडकरांनी ट्विटमधून सगळंच सांगितलं!

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Whatsapp Voice Note Transcription Feature : व्हॉट्सॲपवर जबरदस्त फीचरची एंट्री, पटकन बघून घ्या

SCROLL FOR NEXT