Pavana dam victims protest water shutdown today chandrakant patil pune sakal
पुणे

Pavana Dam Victims Protest : पालकमंत्र्याच्या आश्वासनानंतर पवना धरणावरील मोर्चा १९ मे पर्यंत आंदोलन स्थगित

पवना धरणग्रस्तांचा पवना धरणावर मोर्चा काढत पिंपरी-चिंचवडचे केले पाणी बंद!

सकाळ वृत्तसेवा

पवनानगर : पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेच्या वतीने आज पाणी बंद आंदोलन करण्यात आले मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांनी मोर्चा काढला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. पवनानगर बाजारापेठेतून मोर्चा काढण्यात आला.

यावेळी मोर्चेकरांना अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला तेव्हा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू नका. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हा मोर्चा त्यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक करू नका, असे म्हणत मोर्चा पवना डॅमच्या गेटमधून आत नेला. मोर्चेकऱ्यांनी पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा बंद केल्याचे सांगण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणावर आज धरणग्रस्तांनी तीव्र मोर्चा काढला. या मोर्चात मावळचे आमदार सुनील शेळके आणि धरणग्रस्त शेतकरी सहभागी झाले. पवनानगर बाजारपेठेतून घोषणाबाजी करत मोर्चा पवना धरणावर पोहोचला. मोर्चाची कल्पना असल्याने पिंपरी- चिंचवड, लोणावळा ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. मोर्चासह पोलीस चालत होते.

पवना धरणावर मोर्चा जाताच पोलिसांनी मोर्चेकरांना अडवण्याचा प्रयत्न केला. “आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू नका, शेतकऱ्यांना अडवू नका, आम्हाला गोळ्या घाला असे आमदार सुनील शेळके यांनी म्हणत पोलिसांचा विरोध झुगारून पवना धरण परिसरात मोर्चेकऱ्यांना पुढे घेऊन गेले. गेल्या अनेक वर्षांपासून पवना धरणग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत.

९ मे १९७३ आदेशानुसार ज्या पध्दतीने ३४० खातेदारांचे पुर्नवसन केले आहे त्याप्रमाणे उर्वरित खातेदारांचे चार एकर जमीन आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नोकरी मिळावी, अशा विविध मागण्या घेऊन धरणग्रस्तांनी मोर्चा काढला आहे. या मोर्चाकडे आणि मागण्यांकडे राज्यसरकार कसे पहाते हे बघावे लागेल.

पवनाधरणग्रस्त संयुक्त संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांनी आज (ता.९ ) रोजी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा बंद केला असून आम्हाला जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत पवनाधरणाचे पाणी पिंपरी चिंचवड शहराला पाणी करुन देणार नाही अशी ठोस भूमिका घेतली असुन पवनाधरण पाणी पुरवठा करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयातुन बाहेर काढून कार्यालय बंद केले आहे.

यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, भाजपाचे तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार,काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ,माजी ज्ञानेश्वर दळवी,गणेश धानिवले, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव,पवना संयुक्त संघटनेचे अध्यक्ष नारायण बोडके,रविकांत रसाळ, मुकुदराज काऊर,किसन घरदाळे, बाळासाहेब मोहोळ, दत्तात्रय ठाकर,राम कालेकर यांच्या सह मोठ्या प्रमाणावर आंदोलक असून यावेळी आंदोलन घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

यावेळी बोलताना नारायण बोडके म्हणाले की, पवना धरणाची निर्मिती करत असताना ५९२६ एकर जमीन संपादित करण्यात आली बुडीत क्षेत्रामध्ये निव्वळ ३२०० एकर गेली आहे तर २७१४ एकर बुडीत क्षेत्राच्या बाहेर शिल्लक असताना महसूल विभागाने कोणालाही विश्वसात न घेता वेगवेगळे आरक्षण टाकून १२५४ एकर जमीन वाटपासाठी शिल्लक दाखवल्यामुळे लोकांमध्ये संम्रभ निर्माण झाला आहे.त्यामुळेच हे आदोलन करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना धरणग्रस्त शेतकरी दत्तात्रय ठाकर बोलताना म्हणाले की, महसूल विभागाने आंद्रा धरणासाठी पवना धरणाची ३०४ एकर जागा आरक्षित केली तसेच खाजगी वनीकरणासाठी ३०४ एकर राखीव केली आहे आणि धरणासाठी राखीव ८७ एकर असताना २७० एकर जमीन जास्त घेण्यात आली आहे तसेच ओढ्यानाल्यासाठी आवश्यकता नसताना १६५ एकर जमीन घेतली आहे त्यामुळे महसूल विभाग धरणग्रस्तांची दिशाभूल करत आहेत.

यावेळी मावळ चे तहसीलदार विक्रम देशमुख, खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, उपभियंता अशोक शेटे,पवना अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुजितकुमार राजगिरे शासनाच्या वतीने आंदोलन स्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले.

धरणग्रस्तांशी चंद्रकांत पाटील यांनी फोन व्दारे साधला संवाद

धरणग्रस्तांशी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फोनद्वारे साधला संवाद, १९ मे ला जिल्हाधिकारी, पुर्नवसन अधिकारी व संबंधित खात्याचे अधिकारी यांची बैठक बोलावून तोडगा काढण्याचे दिले आश्वासन दिले असून सध्या सुरू असलेले आंदोलन स्थगित करावे असे आवाहनही पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT