Ajit Pawar : पुणे शहरात ड्रग्स सापडण्याच्या प्रकाराविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने मंगळवारी फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील ज्ञानेश्वर पादुका चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. "पालकमंत्री जबाब दो" अशा घोषणा देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.
फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील तुकाराम महाराज पादुका चौकाजवळ लिक्वीड लेझर लाउंज या बारमधील पार्टीत अमली पदार्थ वापर झाल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला होता.
या पार्श्वभूमीवर, राजकीय पक्ष, संघटना या प्रकाराविरुद्ध रस्त्यावर उतरल्या आहेत. दरम्यान, या प्रकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील ज्ञानेश्वर पादुका चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले.
पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन झाले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.
"शहरात तरुणांमध्ये अमली पदार्थ पोचविण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पब, बारमध्ये अमली पदार्थ मिळू लागले आहेत. एकीकडे कोयता गँग शहरात दहशत परवित असताना आता अमली पदार्थाने शहराला ग्रासले आहे. या सर्व प्रकाराला भाजप सरकार कारणीभूत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा" अशी मागणी जगताप यांनी केली.
फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर अगोदरच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यातच मंगळवारी सकाळी दहा वाजता ज्ञानेश्वर महाराज पादुका चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने आयोजित ड्रग्ज विरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलनास झालेल्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.