pune district bank Sakal
पुणे

PDCC Bank : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता जिल्हा बँकेची बळिराजा योजना; कर्ज उपलब्ध करून देणार

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी बळिराजा मुदत कर्ज योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी बळिराजा मुदत कर्ज योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून बॅंकेच्या शेतकरी सभासदांना शेतीविषयक विविध कामांसाठीच्या खर्चासाठीची गरज या योजनेच्या माध्यमातून तत्काळ पूर्ण केली जाणारआहे.

या योजनेची लवकरच अंमलबजावणी सुरु करण्यात येणार असल्याचे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी शुक्रवारी (ता.२९) सांगितले.

जिल्हा बँकेच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या नवीन योजना आणि नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंतची बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत दुर्गाडे बोलत होते. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, उपसरव्यवस्थापक संजय शितोळे, सहाय्यक सरव्यवस्थापक समीर रजपूत, संजय वाबळे, सुधीर पाटोळे, गिरीश जाधव आदी उपस्थित होते.

दुर्गाडे पुढे म्हणाले, बळिराजा योजनेत गाव पातळीवरील विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत कर्जदार सभासद शेतकऱ्यांना प्रति एकरी दीड लाख रुपये व कमाल सात लाख रुपयांपर्यंत कर्जपुरवठा केला जाणार आहे. या कर्जासाठी सभासदांना दर साल दर शेकडा (द. सा. द. से.) १०.५ टक्के टक्के व्याजदर आकारण्यात येणार आहे.

याशिवाय केंद्राच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेत कृषी व पूरक सेवा, प्रक्रिया उद्योग तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, कृषी पायाभूत सुविधा निधी, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ योजनेतंर्गत कर्जपुरवठा सुरु करण्यात आला आहे.’’

बॅंकेतर्फे १६५ कोटींचे गृह कर्ज

दरम्यान, जिल्हा बँकेने नोकरदारांसाठी दर साल दर शेकडा ८ टक्के व्याजदराने गृहकर्ज वाटप करण्यास सुरूवात केली आहे. यानुसार आतापर्यंत १६५ कोटींचे गृह कर्ज वाटप करण्यात आले आहे. याशिवाय १२२ कोटी रुपयांचे शैक्षणिक कर्जवाटप करण्यात आले आहे.

नोटबंदी काळातील 22 कोटी रुपयांच्या एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा अद्याप बँकेकडे तशाच पडून आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे प्रस्ताव दिला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आता नवीन एजन्सीमार्फत नोकरभरती होणार

जिल्हा बँकेच्या नोकर भरतीमध्ये पूर्वी नेमलेल्या एजन्सीबाबत राज्यातील अन्य काही बँकांनी तक्रारी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे संबंधित एजन्सीचा करार बँकेने रद्द केला आहे. मात्र बँकेतील विविध संवर्गातील ३५६ रिक्त जागांची भरती ही पूर्वी प्राप्त झालेल्या अर्जांमधूनच केली जाणार आहे.

यासाठी लवकरच नवीन एजन्सीची नियुक्ती केली जाणार आहे. सध्या जिल्हा बँकेत सध्या ८०० हून अधिक जागा रिक्त असल्याचे यावेळी दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील घसरण थांबणार का? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Sharad Pawar : सरकार बदलायचे लोकांनीच ठरवले आहे....शरद पवार यांचे प्रतिपादन; वरवंडमध्ये रमेश थोरात यांची प्रचार सभा

श्रीदेवीसोबत तुझं कट्टर वैर होतं? माधुरी दीक्षित स्पष्टच म्हणाली- ती एक चांगली अभिनेत्री होती पण मी...

SCROLL FOR NEXT