पुणे

PDCC निवडणूक - मुळशीत सुनिल चांदेरेंचा विजय; कलाटेंचा पराभव

निवडणूकीत चांदेरे यांच्या विजयाने धनशक्ती आणि बलशक्तीविरोधात जनशक्तीचा विजय झाला.

तेजस भागवत

अजित पवार यांचा सुनिल चांदेरे यांना पाठींबा तर दुसरीकडे तब्बल बावीस वर्षाचा आत्माराम कलाटे यांचा दिर्घ अनुभव यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणूकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

पौड : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत(pune district central cooperative bank election) मुळशी तालुक्यात(mulshi taluka) 45 पैकी 27 मते घेत राष्ट्रवादीचे नवखे सुनिल चांदेरे यांनी आत्माराम कलाटे यांचा पराभव केला. चांदेरेंच्या विजयामुळे मुळशीच्या सहकारातील गादीच्या सत्तापरिवर्तनाला प्रारंभ झाला. प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणूकीत चांदेरे यांच्या विजयाने धनशक्ती आणि बलशक्तीविरोधात जनशक्तीचा विजय झाला.

तालुक्यात 46 विकास सोसायट्या आहेत. जिल्हा बॅंकेच्या संचालक(district bank chairman) पदावर आत्माराम कलाटे हे गेली बावीस वर्षांपासून विराजमान होते. एक वर्ष बॅंकेचे अध्यक्षपदही त्यानी उपभोगले. राष्ट्रवादीच्या माध्यमातून कलाटे यांना बॅंकेवर काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी गेली दोन वेळा राजाभाऊ हगवणे यांचा पराभव केला होता. तथापि अडीच वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीपूर्वी कलाटे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून गळ्यात शिवबंधन घातले. भोर विधानसभेतून सेनेकडून उमेदवारी मिळेल ही अपेक्षा त्यांना होती. परंतू याठिकाणी त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली. अर्थात त्या निवडणूकीत त्यांना दहा हजाराच्या आतच समाधान मानावे लागले. हाच निर्णय त्यांच्या भवितव्यासाठी चुकीचा ठरला गेला.

दुसरीकडे सुनिल चांदेरे हे राष्ट्रवादीचे विद्यार्थी दशेपासून शरद पवार, अजित पवार, सुप्रियाताई सुळे यांच्या विचारांना माननारे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. आपल्या तडफदार वक्तृत्वशैलीमुळे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष असताना पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता आणण्यास त्यांची कामगिरी मोलाची ठरली. तथापि आतापर्यंत त्यांच्याकडे लोकनियुक्त पद नव्हते. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीसाठी वरीष्ठांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर गेली दोन वर्षांपासून विकास सोसायटीच्या प्रतिनिधी निवडीपासून प्रयत्नरत होते. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे यांनीही अजित पवार, सुप्रियाताई सुळे यांना चांदेरेच्या विजयाबद्दल आत्मविश्वास दिला.

तथापि कोरोना आणि न्यायालयाच्या निर्णयामुळे या निवडणूका लांबत गेल्या. दरम्यान आत्माराम कलाटे यांनीही आपल्या बाजूचा प्रतिनिधी यावा यासाठी डावपेच आखले. निवडणूकीच्या शेवटच्या क्षणी तीन सोसायट्यांचे प्रतिनिधीही बदलले गेले. तर जामगावला वेळीच प्रतिनीधी न मिळाल्याने ही सोसायटी निवडणूकीपासून वंचित राहीली.

एकीकडून अजित पवार यांचा सुनिल चांदेरे यांना पाठींबा तर दुसरीकडे तब्बल बावीस वर्षाचा आत्माराम कलाटे यांचा दिर्घ अनुभव यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणूकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कोंढरे आणि त्यांची टिम एकएक मत गोळा करण्यासाठी रात्रंदिवस पळत होती. त्याचदरम्यान राष्ट्रवादीतीलच काही मंडळी मात्र पडद्याआडून कलाटे यांच्यासाठी सूत्रे हालवत होती. या निवडणूकीत मतदाराला आपल्याकडे वळविण्यासाठी साम दाम दंड भेद या नितीचाही वापर केला गेला. गुन्हेगारीची दहशतही दाखविली गेली. मतदारांच्या खिशात नोटांचा पाऊस पडला. त्यांची दररोज या निवडणूकीच्या चर्चेचा रंग बदलत होता. तथापि 45 पैकी 27 मते घेवून चांदेरे यांनी विजयाचा शिक्कामोर्तब केला. आणि कलाटे यांची सहकारातील बावीस वर्षांची परंपरा मोडीत काढली. चांदेरे यांचा हा विजय म्हणजे तालुक्याच्या पुढील होणाऱ्या सहकाराच्या निवडणूकीतील परिवर्तनाची नांदी असल्याचे बोलले जात आहे.

या विजयात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱी कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे. राष्ट्रवादीच्या तालुक्यातील एकजुटीचा हा विजय आहे. -महादेव कोंढरे अध्यक्ष, मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस

सुनिल चांदेरे (नवनिर्वाचित संचालक) - या निवडणूकीतून मुळशीकरांनी जनशक्तीपुढे धनशक्तीचे काहीही चालत नाही हे दाखवून दिले आहे. पक्षाचे पाठबळ आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्तांच्या धावपळीमुळे हा विजय झाला. सहकारात पक्षाला आणि जनमताला अभिप्रेत असेच काम करणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT