Wagholi Accident sakal
पुणे

Wagholi Accident : वाघोलीत डंपरच्या धडकेत पादचारी तरुणी गंभीर जखमी,आमदार अशोक पवार यांनी स्वतः उचलून पाठविले उपचारासाठी

निलेश कांकरिया

वाघोली : वाघोलीत रविवारच्या डंपर अपघातात महिलेचा बळी. बुधवारी कोथरूड परिसरात मिक्सर च्या धडकेत तरुणीचा बळी. ही अपघातांची मालिका सुरू असताना आज सकाळी वाघोलीत डंपरच्या धडकेने एका तरुणीला आपले दोन्ही पाय गमवावे लागल्याची घटना सकाळी आठच्या सुमारास घडली.

या अपघाता दरम्यान तेथून जाणारे आमदार अशोक पवार यांनी त्या तरुणीला तात्काळ आपल्या कार मधून रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा बाळासाहेब मंडलिक ( वय २३, रा. वाघोली )  ही तरुणी वाघोलीत पुणे नगर महामार्गावरून महामार्ग ओलांडत होती. छत्रपती श्री शिवाजी पुतळ्याजवळ तिला डंपरची धडक बसली.

तिच्या पायावरून डंपरचे चाक गेल्याने ती विव्हळत होती. आमदार अशोक पवार हे तेथून एका दशक्रिया विधी साठी जात होते. त्यांच्या चालकाने आरशात हा अपघात पहिला. त्यांनी ही बाब त्वरित पवार यांना सांगितली. आमदार पवार यांनी तत्काळ त्या तरुणीकडे धाव घातली. कार मधील शाल तिला लपेटून आपल्या कार मधून वाघोलीतील एका खाजगी रुग्णालयात पाठविले. तरुणी गंभीर असल्याने तिच्यावर प्राथमिक उपचार करुण्यात आले.

यानंतर तिला रुग्णालयातून पुण्यातील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. सोबत त्यांचे स्विय सहायकही त्यांनी पाठविले. अपघाता नंतर चालक डंपर सोडून पळून गेला. सकाळी ७ ते ११ डंपर वाहतुकीला बंदी असूनही पोलिसांचा आदेश झुगारून डंपर चालक वाहतूक करीतच आहेत.

अति दक्षता विभागात खाट मिळविण्यासाठी अनेक फोन

या तरुणीला रुबी हॉल मध्ये नेण्यात आले. मात्र तेथे अति दक्षता विभागात खाट नसल्याचे रुग्णालयाने सांगितले. हे कळताच पवार यांनी जिल्हाधिकारी, चॅरीटी आयुक्त व अन्य अधिकाऱ्यांना फोन केले. ज्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाले त्यांना रुबी मध्ये खाट उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली.

दीड तासानंतर उपचार सुरू

त्या गंभीर जखमी महिलेला उपचारासाठी रुबी हॉल मध्ये नेल्यानंतर दीड तास त्या महिलेला रुग्णवाहिकेत उपचाराची वाट बघावी लागली. डॉक्टरांनी तिच्या वर उपचार देखील केले नाही. दीड तासानंतर तिला आत घेतले. याबाबत आमदार पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली

जिल्हाधिकारी यांच्याबाबतही नाराजी

त्या महिलेच्या उपचारासाठी खाट मिळावी यासाठी आमदार पवार यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनाही फोन केला होता. त्यांनी त्यांचा फोन घेतला नाही. पुन्हा पवार यांच्याशी दुपारी २ पर्यंत त्यांनी संपर्कही केला नाही. याबाबत ही पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

थांबण्यासाठी हात करुनही डंपर आलाच

मनीषा यांनी रस्ता ओलांडताना लांबवर असलेल्या डंपरला हात करून थांबण्यास संगितले. मात्र डंपरने येवून धडक दिलीच. असे तिचे वडील बाळासाहेब मंडलिक यांनी सांगितले.

तर ब्रेक लागणार कसा

डंपर मध्ये क्षमतेपेक्षा अती प्रमाणात खडी, क्रश सॅन्ड भरली जाते. अती क्षमतेमुळे या वाहनांचे ब्रेक लागत नाही. त्यामुळे अपघात होतात. तर चालकाला एका फेरी मागे २०० ते ३०० रुपये जास्त दिले जातात. त्यामुळे ते जास्त फेरी करण्याच्या नादात भरघाव डंपर चालवतात. त्यातून अपघात होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratan Tata: रतन टाटा अनंतात विलिन! शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

Baramati News : 'भारत फोर्ज' बारामतीत उभारणार 2000 कोटींचा मेगा प्रकल्प...

Dombivali News : कल्याणमधील प्रसिद्ध बिल्डरला गोळी लागली, बिल्डरसह त्यांचा मुलगा जखमी

PAK vs ENG: इंग्लडने सामन्यात घेतली पाकिस्तानला न झेपणारी आघाडी; फलंदाजांनी केली इंग्लंडची नौका पार

Ratan Tata : भावुक क्षण! रतन टाटांच्या लाडक्या 'गोवा' ने घेतले अंत्यदर्शन; काय आहे हृदयस्पर्शी कहाणी?

SCROLL FOR NEXT