पुणे : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत जिल्ह्यात नाटक, लोककला अंतर्गत तमाशा लावणीसह इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिली आहे.
राज्य सरकारने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १३ मार्चपासून लागू केला होता.
पाच नोव्हेंबर रोजी लोककला अंतर्गत तमाशा लावणी व इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली होती. परंतु काही जिल्ह्यांमधून सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, लोककला अंतर्गत तमाशा, लावणी कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींमार्फत विभागास प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार सांस्कृतिक कार्य विभागामार्फत जारी केलेल्या आदेशानुसार नाटक, लोककला अंतर्गत तमाशा लावणी आणि इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.