Petrol Diesel price File photo
पुणे

इंधन दरवाढ कायम; पुण्यात पेट्रोल शंभरी पार

गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने दरवाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधन स्वस्त झाले असले तरी, राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध करांमुळे देशातील इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत चालली आहे.

सकाळ वृत्तसेवा

गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने दरवाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधन स्वस्त झाले असले तरी, राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध करांमुळे देशातील इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत चालली आहे.

पुणे : गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने वाढत असलेल्या इंधनाच्या (Petol-Diesel Price hike) दराने आज राज्यभरात उच्चांक गाठले आहेत. पुण्यात पहिल्यांदाच पेट्रोलने (Petrol) शंभरी ओलांडली आहे. राज्यातही अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर शंभरीपार गेले आहेत. सोमवारी (ता.३१) पुण्यात पेट्रोलचे दर १००.१५ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरांवर सामान्य नागरिकांमधून मात्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. पुण्यात साधे पेट्रोल १००.१५ रुपये प्रति लिटरवर जाऊन पोहोचले आहे. पॉवर पेट्रोलचे (Power Petrol) दर या आधीच शंभरीपार पोहोचले आहेत. पॉवर पेट्रोलसाठी १०३.८३ रुपये, तर डिझेलसाठी प्रति लिटर ९०.७१ रुपये मोजावे लागत आहेत. सीएनजी (CNG)चे (५५.५० रुपये) दर स्थिर आहेत, अशी माहिती ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी दिली. (Petrol and Diesel price today May 31st 2021 fuel price record high in Pune also Maharashtra)

पेट्रोल दरवाढ सध्या सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पुण्यात गेल्या आठवड्यापासून पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ सुरूच आहे. पुण्यात गेल्या आठवड्यात पेट्रोलचे दर ९९.८७ रुपये इतके होते. आता त्यात वाढ होऊन पेट्रोल १००.१५ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. देशातील इतर महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल सर्वाधिक महाग असल्याचे दिसून येत आहे. ४ मे रोजी मुंबईत पेट्रोलचा दर ९६.९५ रुपये प्रतिलिटर होता. आतापर्यंत यामध्ये ३.५२ रुपयांची वाढ झाली आहे. काही दिवस इंधनाचे दर स्थिरसुद्धा झाले होते. पुन्हा दरवाढ सुरू झाल्याने, आज मुंबईकरांना १००.४७ रुपये लिटर दराने पेट्रोल विकत घ्यावे लागत आहे.

राज्यभरातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी इंधन दरवाढ असल्याचे इंधन कंपन्यांकडून सांगितले जात आहे. देशातील पाच राज्यांच्या निवडणुका संपताच देशभरात इंधन दरवाढ सुरू झाली. गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने दरवाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधन स्वस्त झाले असले तरी, राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध करांमुळे देशातील इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत चालली आहे.

राज्यभरात पेट्रोलचा भडका

रायगड आणि ठाणे वगळता राज्यातील एकूण ३४ जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या दराचा भडका उडाला आहे. नांदेड, परभणी जिल्ह्यांमध्ये १०२ रुपयांपेक्षा जास्त पेट्रोलच्या दराची नोंद झाली, तर अमरावती, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद, रत्नागिरी, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये प्रतिलिटर पेट्रोलचे दर १०१ रुपयांपेक्षा जास्त आहेत.

डिझेल दराचाही उच्चांक

मालवाहतूकदारांकडून डिझेलचा सर्वाधिक वापर केला जातो. त्यामुळे डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका मालवाहतूकदारांना बसला आहे. कोरोना काळात अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू आणि मालाची वाहतूक सेवा सुरू असताना, डिझेल दरवाढीमुळे दुहेरी संकटाचा सामना वाहतूकदारांना करावा लागत असल्याचे ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट काँग्रेसचे सदस्य बाबा शिंदे यांनी सांगितले.

परभणीत पेट्रोल १०२.५७ रुपयांवर

राज्यात सर्वाधिक पेट्रोलचे दर परभणीत आहेत. रविवारी (ता. ३०) पेट्रोल १०२.५७ रुपये तर, डिझेल प्रतिलिटर ९३ रुपये चार पैशांनी विकले जात होते. पॉवर पेट्रोलचा दर १०५ रुपये २२ पैसे होता. वाहतूक खर्च वाढीमुळे येथील इंधन दर सर्वाधिक असतात. सातत्याने दरवाढ होत असल्याने वाहनधारकांत नाराजीचा सूर आहे.

विविध शहरांतील दर (रुपयात)

शहर - पेट्रोल - डिझेल

मुंबई - १००.४७ - ९२.४५

दिल्ली - ९४.२३ - ८५.१५

चेन्नई - ९५.७६ - ८९.९०

कोलकत्ता - ९४.२५ - ८८.००

भोपाळ - १०२.३४ - ९३.३७

दरम्यान, केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक पातळीवर अपयशी ठरले आहेत. पेट्रोल, डिझेलची सततची वाढ होत असून, पेट्रोलने शंभरी गाठली आहे, अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे.

राज्यभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT